चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला.

चंद्रपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरवर हल्ला.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरावर रुग्णाच्या नातेवाईकाने हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडली.रोहित होरे वय,२७ असे जखमी डॉक्टरांचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी साजिद शेख वय,२३ रा.दुर्गापूर, मुद्दतसिर सुलतान खान वय,२३ या दोघांना अटक केली आहे.


सोमवारी निवासी डॉ. रोहित होरे हे अपघात विभागात एका रूग्णांवर उपचार करीत होते. दरम्यान, आठ वर्षीय मुलीला घेऊन एक पालक आले. तिच्या पोटात दुखत होते. यावेळी पालकांनी मुलीला लवकर पाहण्यासाठी डाॅ. रोहित होरे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. डॉक्टर रोहितने संधी साधून बाहेर पळ काढून आपला जीव वाचवला. ही बाब सहकारी डॉक्टरांना माहिती होताच निवासी डॉक्टर व शिकाऊ डॉक्टरांनी एकच गर्दी केली.


घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजपूत लगेच आपल्या चमुसह वैद्यकीय महाविद्यालयात हजर झाले. पोलिसांनी लगेच आरोपी साजिद शेख, मुद्दतसिर सुलतान खान या दोघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !