प्रा.संतोष बारसागडे सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२३ ने सन्मानित.
एस.के.24 तास
चंद्रपूर : दिनांक ९ सप्टे.२०२३ रोज शनिवार ला शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट, मुंबई येथे भगवा फाऊंडेशन, मुंबई, महाराष्ट्र राज्य द्वारा सक्षम भारतीय नागरिक घडविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सामाजिक बांधिलकी मानून ज्ञानदान करित विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांतून प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नव निर्मितीक्षम शिक्षक व शिक्षिकांना तसेच शिक्षणबाह्य क्षेत्रात सामाजिक भूमिका घेऊन प्रबोधनपर कार्य करणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व विविध जनसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो.
गेल्या २२ वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर लेखक व नाट्य कलावंत म्हणून सातत्याने कार्य करीत असलेले संवेदनशील कवी,गीतकार, संगीतकार सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून प्रबोधनात्मक कार्य करणारे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय चंद्रपूर येथील प्रा. संतोष बारसागडे याना मा.प्रा.डी.एन.संदानशिव मा. सदस्य, विधी आयोग,भारत सरकार यांच्या हस्ते सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार -२०२३ बहाल करण्यात आला.
या प्रसंगी मा.डॉ.अशोक सुनतकरी,मा.योगीराज बागुल,मा.धम्मचारी बोधिसेन,मा.अनिल म्हमाने,ॲड. करूणा विमल,मा.छाया पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.