आय.टि.आय प्रवेशाचा अंतीम टप्पा : मोजक्याच जागा उपलब्ध.
एस.के.24 तास
सावली : महाराष्ट्र शासनाने व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण खात्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर तालुकानिहाय व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण देणाऱ्या औदयोगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी केली आहे. सध्या आय.टि.आय प्रवेशाचा अंतीम टप्पा असुन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सावली तालुक्यातील औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमधे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक या व्यवसायाच्या आय.एम.सी अंतर्गत चार जागा,रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनींग व्यवसायाच्या आय.एम. सी अंतर्गत चार जागा तसेच सुइंग टेक्नॉलॉजी या व्यवसायाच्या कॅप राउन्ड अंतर्गत पाच व आय. एम. सी. अंतर्गत चार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आय. एम. सी अंतर्गत प्रवेश निश्चीत केलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येईल.तसेच राज्य शासनाने यावर्षीपासुन प्रशिक्षणार्थ्यांना मासीक पाचशे रूपये विद्यावेतन देण्याचे मंजुर केले आहे.
वरील तीनही व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. पंप ऑपरेटर कम मेकॅनीक या अनेक प्रशिक्षणार्थ्याना विदयुत निर्मीती केंद्र, कोल माइन्स तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनींग या व्यवसायाचे प्रशिक्षणप्राप्त उमेदवारांना आखाती देशात तसेच सुइंग टेक्नॉलॉजी व्यवसायाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना गारमेंट इंडस्ट्री व आर्डनन्स पॅराशुट फॅक्टरी मधे मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
प्रवेश प्रक्रियेमधे सहभागी झालेल्या परंतु प्रवेश निश्चीत न केलेल्या उमदेवारांसाठी दि. 10/9/2023 पर्यंत प्रवेश पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ज्या उमेदवारांनी अजुनपर्यंत आय. टि. आय. साठी प्रवेश अर्ज केला नाही परंतु आय .टी. आय ला प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी दि. 12-09-2023 पासून 23/09/2023 पर्यंत समुपदेशन फेरीच्या तिसऱ्या सत्राअंतर्गत आपले प्रवेश निश्चीत करण्यासाठी अखेरची संधी आहे.
शैक्षणीक जागृतीच्या बाबतीत सावली तालुका अग्रेसर असून स्थानीक उमेदवारांनी तसेच ज्यांना आय टी आय प्रवेशापासून पात्र असुनही वंचित राहावे लागले अशा सर्वानी वरील संधीचा लाभ घ्यावा असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावलीचे प्राचार्य(स) एन.एन.गेडकर यांनी कळविले आहे.