पोषण आहार जनजागृती कार्यक्रम घेऊन गावातून रॅली काढण्यात आली.

पोषण आहार जनजागृती कार्यक्रम घेऊन गावातून रॅली काढण्यात आली. 


एस.के.24 तास


राजुरा : आज दि.01-09-2023 रोज शुक्रवार ला मोजा मंगी बु. येथे माननीय श्री.दीपक साळवे सर  (pu cordinator ACF BC) यांच्या मार्गदर्शनाखाली अंबुजा सीमेंट फाऊंडेशन,उत्तम कापूस अंतर्गत पोषण आहार जनजागृती कार्यक्रम घेऊन गावातून  रॅली काढण्यात आली. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय श्री.शंकर तोडासे साहेब  सरपंच ग्रामपंचायत मंगी बु.कार्यक्रमाचे उदघाटक श्री.श्रीकांत कुंभारे सर(Zonal Manager ACF),प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.जितेंद्र बैस सर विशेष अतिथी म्हणून उपसरपंच वासुदेव चापले व परशुराम तोडासाम सर उपस्थित होते.

          

शंकर आत्राम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री.जितेंद्र बैस सर अंबुजा सीमेंट फाऊंडेशन  व पोषण आहार कार्यक्रम चे महत्त्व समजाऊन सांगितले.माननीय श्री. श्रीकांत कुंभारे सर यांनी सध्याच्या खानपानाचे दुष्परिनाम व संभाव्य शेतीतील बदल या विषयी मार्गदर्शन केले. माननीय श्री.शंकर तोडासे यांनी  पौष्टिक आहार या विषयावर मार्गदर्शन केले.

           

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज भसारकर यांनी केले.व आभार प्रदर्शन. श्री.बापूजी पेंदोर यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अंकुल सलाम,साक्षी वाग्दरकर,चंदा पोटे यांनी मदत केली.या कार्यक्रमाकरिता INMH01 च्या वतीने माहितीपत्रके व चार्ट तयार करण्यात आले व माहिती समाजावुन सांगण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !