सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. ★ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार,एक गंभीर.

सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक.


★ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार,एक गंभीर.


एस.के.24 तास


गडचिरोली : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील दुचाकी वरील तिघे जागीच ठार झाले.तर एक गंभीर जखमी आहे. ही घटना २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजे च्या सुमारास घडली.मृतांत आई- मुलासह चुलत सासूचा समावेश आहे.एकाच कुटुंबातील तिघे गतप्राण झाल्याने मार्कंडा गावावर शोककळा पसरली आहे.


प्रियंका गणेश जनध्यालवार वय,२४ वर्ष ,रुद्र गणेश जनध्यालवार वय,५ वर्ष  व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) अशी मृतांची नावे आहेत.नरेंद्र नरेश जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत. मार्कंडादेव ता.चामोर्शी येथील हे कुटुंब कामानिमित्त तहसील कार्यालयात आले होते. 


काम आटोपून दुपारी ४ वाजता दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) गावी जाण्यासाठी निघाले.याचवेळी सुरजागड येथून लोहखनिज घेऊन ट्रक (सी.जी.०८ एयू- ९०४५) येत होता. या ट्रकने तहसील कार्यालयासमोर दुचाकीला चिरडले. दुचाकी समोरील चाकाखाली सापडल्यानंतर १० तेे १५ फूट फरफटत गेली. रुद्र व भावना यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रियंका यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडले. नरेंद्र जनध्यालवार यांची मृत्यूशी झुंज सुरु आहे.


दरम्यान, अपघातानंतर चालकाने वाहन तेथेच सोडून पोबारा केला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकमध्ये फसलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलवावा लागला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिकांनी सूरजागड लोह खनिज वाहतुकीविरुध्द तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी पो.नि.विजयानंद पाटील यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह ट्रकखालून काढून रुग्णालयात पाठवले.


कुटुंबावर दुसरा आघात अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या रुद्र याचे वडील गणेश जनध्यालवार यांचा २० दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्या.या दु:खातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे जनध्यालवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !