पीएम स्किल रन मिनी मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी: आ. जोरगेवार व आ.अडबाले यांनी दाखविली हिरवी झेंडी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर द्वारा पीएम स्किल रन (कौशल्य दौड ) स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आलेले होते.
ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत हुतात्मा स्मारक शास.औ.प्र.संस्था ते जटपूरा गेट (महात्मा गांधी पुतळा) परत शास.औ. प्र. संस्था या मार्गाने घेण्यात आली . या स्पर्धेत शास औ. प्र. संस्थेचे प्रशिक्षणार्थी आणि शहरातील पाच खाजगी औ. प्र. संस्थेच्या ४६७ प्रशिक्षणार्थांनी आँनलाईन नोंदणी केली तर ३५४ स्पर्धक प्रत्यक्ष धावले.या स्पर्धेचे उद्घाटन आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते , शिक्षक आ. सुधाकर अडबाले, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा, एसबीआय चे रिजनल मॅनेजर पूर्णेदू कांतमिश्रा, चिफ मॅनेजर पंकज चिखले, मुख्य ब्रांच मॅनेजर रवी बनसोड, बँकेचे लीड बँकेचे अतुल तागडे , पीएसआय लांबट आदींची प्रमुख उपस्थिती प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य रवी मेहेंदळे होते. या स्पर्धेचे प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी केले. उत्तम व्यवसाय कौशल्ये प्राप्त केले तर इतरत्र धावण्याची गरज पडणार नाही आणि उत्तम कौशल्य प्राप्त करण्यासाठी धावपळ केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत हा सुंदर संदेश या स्पर्धेचा दिसून येतो याबद्दल आ. जोरगेवार यांनी आयोजकाचे मनःपूर्वक कौतुक केले तर आ. अडबाले यांनी स्पर्धेच्या एकूण आयोजनाबाबत समाधान व्यक्त करून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात.
या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक जय अरुण भोकरे, द्वितीय शुभम सिंग चव्हाण (शास.औ . प्र.संस्था ), तृतीय सुशांत माणिक नगराडे (कर्मवीर औ.प्र.संस्था) तर महिला गटात प्रथम क्रमांक कु. अभिलाषा भगत (कर्मवीर औ.प्र. संस्था), द्वितीय क्रमांक रंजना उपरे(इंदिरा औ.प्र.संस्था), तृतीय क्रमांक चैताली सुधीर बोबडे (शास.औ.प्र. संस्था)यांनी पटकाविला. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानपत्र आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.आँनलाईन नोंदणी केलेल्या सहभागी स्पर्धकांना डिजिटल आँनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियोजन गटनिदेशक पि.आर.बोकडे, बंडोपंत बोढेकर,अभय घटे, महेश नाडमवार यांनी केले तर परिक्षण जितेंद्र टोंगे, विलास खेडेकर,अभय घटे,सौ. चिप्पा, सौ. गराड, कु. साखरकर यांनी केले तर पायलट गाडी चे नियोजन श्री. गराड, राजेंद्र पोटदुखे, बोढाले तर स्पर्धा दरम्यान चौकातील स्टालवर श्री. माकोडे, इटनकर, कु. आमटे , श्री.जयपुरकर ,रामटेके ,भोंगळे, ,आसुटकर, कु.माकोडे, कु. नंदुरकर, श्री. बुरांडे श्री. भगत कु. लोनगाडगे, श्री. मेश्राम, श्री .लाखे श्री पाईकराव, श्री .साखरकर, श्री. दुपारे, श्री. रणदिवे, श्री. खोब्रागडे ,सौ. हेलवडे, श्री.कोठारकर, श्री. रोडे , साई औ.प्र.संस्थेचे प्राचार्य राजेश पेशट्टीवार, कर्मवीर औ. प्र.संस्थेचे प्राचार्य मुन आदींनी सहकार्य केले. स्पर्धे करिता रामनगर पोलीस स्टेशन , पोलीस वाहतूक विभाग तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे सहकार्य लाभले.