नान्होरी,दिघोरी वासीयांचा वाहत्या प्रवाहाच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास.
★ पावसाळ्यात रस्त्यावरून वाहतो नेहमीच पाणी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२८/०९/२३ सरकार कोणताही असो, मात्र नान्होरी,दिघोरी,तपाळ,बेलगाव,ही समस्या अनेक वर्षा क पासून कायम आहे.सदर गावे ही चिमुर विधानसभा मतदारसंघ मध्ये समाविष्ट आहेत. पण कोणताही लोकप्रतिनिधी या समस्येकडे लक्ष देत नसल्याचे नागरिक बोलत आहेत.
नान्होरी ते ब्रम्हपुरी रस्त्यावरून किमान ८ ते १० हजार लोक प्रवास करीत असतात.अनेक वर्षा पासून नान्होरी रस्त्यावरून नाला वाहतो ल.या नाल्यावर पुल बांधकाम करण्याची मागणी जनतेने केली आहे.ब्रम्हपुरी ते नान्होरी रस्त्यावर असलेल्या रपट्या वरुन पाणी पातळी वाढली की,नाल्याचे पाणी रपट्या वरून वाहत असते. येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवघेणा प्रवास करीत असतात.
नान्होरी ते ब्रम्हपुरी रस्ता हा नाल्यामधुन जात असल्याने येथील नान्होरी, दिघोरी, तपाळ, बेलगाव येथील नागरिक जीव धोक्यात घेऊन येणे- जाणे करतात.अनेक वर्षा पासून या नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागते आहे.सदर नाल्यामधुन गेलेला रोड पाण्याच्या प्रवाहाने कोसळून गेला.
जर नागरिकांची दुचाकीअनवधानाने ओढणा-या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागेल अशी शंका निर्माण होत आहे. नान्होरी, दिघोरी,तपाळ,बेलगाव येथील विद्यार्थी ब्रम्हपुरी येथे शालेय शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अनेक गर्भवती महिला सुध्दा आपल जीव धोक्यात घेऊन ब्रम्हपुरी येथे उपचारासाठी रुग्णालयात येत असतात. नाल्याच्या रोडवरील नेहमीच रस्त्यावरून पावसाळ्यात पाणी वाहत असते.
शासनाने याची त्वरित दखल घेऊन भविष्यात ऊद्भवणा-या संकटातून सुटका करावी अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.