बहुजन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरच्या डॉक्टरांनी डॉक्टर, अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष,नानाभाऊ पटोले यांची भेट. ★ भारत जोडो अभियानाला पाठिंबा दर्शविला.

बहुजन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरच्या डॉक्टरांनी डॉक्टर, अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष,नानाभाऊ पटोले यांची भेट.


★ भारत जोडो अभियानाला पाठिंबा दर्शविला.


एस.के.24 तास


चंद्रपूर : बहुजन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरच्या डॉक्टरांनी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन भारत जोडो अभियानाला पाठिंबा दर्शविला आज दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी यात्रा संयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नामदार नानाभाऊ पटोले यांच्यासोबत बहुजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूर यांच्यासोबत राजकीय सामाजिक व सध्या स्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


संविधान विरोधी मनूवादी संकटाला समोर जाण्यासाठी व देशातील सार्वभौमत्व आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघविरोधी शक्तींना एकत्रित करून देशाला हुकूमशाही पासून वाचवणे यासाठी बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली चंद्रपुरातील सामाजिक राजकीय बदलाबाबत योग्य त्या योजना आखण्यासाठी कटिबद्धता व डॉक्टर व बुद्धिजी वर्गाचा साथ सहयोग देण्याचे आश्वासन यावेळेस डॉक्टरांनी दिले.जवळपास 45 मिनिट चाललेल्या  चर्चेत नानभाऊंनी चंद्रपुरात बहुजन मेडिकल असोसिएशन तर्फे राबविल्या जाणाऱ्या पुरोगामी चळवळीबद्दल आनंद व्यक्त केला.


करिअरवाला पुस्तकाचे लेखक आणि सुप्रसिद्ध करिअर कौन्सेलर माननीय विजय मुसळे यांनी नाना भाऊंना त्यांचे पुस्तक भेट दिले.त्यावेळी नाना भाऊंनी त्यांना साकोली मध्ये कार्यक्रम घेण्यासाठी आमंत्रित केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !