पंधरा वर्षापासून कोरीव कलेची कला जोपासणारा कैलास वकेकार - अ-हेरनवरगाव

पंधरा वर्षापासून कोरीव कलेची कला जोपासणारा कैलास वकेकार -        अ-हेरनवरगाव


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,०१/०९/२३ (श्री अमरदीप लोखंडे, सहसंपादक) कोणतीही कला असो मानवाला दिलेली ही एक नैसर्गिक देणगी,  दुसऱ्याचे अनुकरण करून ती  आत्मसात केलेली अथवा ही मिळविण्यासाठी गुरु चे मार्गदर्शन कोण्या कलाकाराला कला ही जन्मजात मिळणारा अलंकार आहे.मग ती कोणतीही असो.ब्रह्मपुरी तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अ-हेर नवरगाव येथील कैलास वकेकार हा पंधरा वर्षापासून कलेचा छंद जोपासत आहे.

तो मातीच्या,सिमेंट च्या कोणत्याही देव देवतांच्या , समाज सुधारकांच्या मूर्ती जशी मागणी येते त्या पद्धतीने ग्राहकांना बनवून देत असतो.एखादा माणूस ,थोर महापुरुषांचा फोटो त्याच्या समोर उभा केला ,ठेवला तर हुबेहूब त्या पद्धतीने तो त्या माणसाची,महापुरुषाची,प्राण्याची मूर्ती,पुतळे तयार करीत असतो.ऐन सणासुदीच्या काळात पोळा, गणेशोत्सव,दुर्गा उत्सव, महालक्ष्मी यासारख्या मोठमोठ्या देवी, देवतांच्या मुर्त्या आपल्या कलेद्वारे बनवून त्याने मूर्तिकार कैलास वकेकार अ-हेरनवरगाव चे नाव प्रसिद्ध केले आहे.


येत्या पोळ्याच्या सणाचे औचित्य साधून त्याने सुबक, सुरेख आणि रेखीव असे नक्षीकाम करून लाकडाचे नंदीबैल तयार केलेले आहेत.या तयार केलेल्या नंदीबैलाला गडचिरोली व इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठी मागणी आहे.त्याने तयार केलेल्या या नंदीबैलांची किंमत रुपये 70 हजार देऊन एका व्यापाऱ्याने विकत घेतली आहेत असे त्याने नंदीबैलावरती अखेरचा हात फिरविताना सांगितले आहे.


त्याच्या या पंधरा वर्षापासून चालत आलेल्या महान कलाकृतीला आणखी बळकटी मिळावी आणि कैलास वकेकार मूर्तिकार अ-हेर नवरगाव म्हणून देशात प्रसिद्ध होण्यासाठी अहोरात्र झटून हुबेहूब मुर्त्यांना आकार देत असतो. त्यांनी तयार केलेल्या कोणत्याही मुर्त्यांना लोकांचा खूप प्रतिसाद मिळतो. आणि त्याच्या कलेला पाहणारे खूप दाद देत असतात. 


मन भरून त्याचे कौतुक करतात.शासनाने  खेडेगावातील कलाकारांना कलाकारांनी मागणी केल्यानुसार अर्थसाह्य करून त्यांना हातभार लावावा अशी कलेची पारख करणाऱ्या जनमानसांची प्रतिक्रियाआहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !