मुख्यमंत्र्यांनी आता ओबीसींचे अन्नत्याग आंदोलन ही संपवावे. - विरोधी पक्ष नेते,विजय वडेट्टीवार यांची मागणी ★ सरकार कडे कोणतेही काम नाही.

मुख्यमंत्र्यांनी आता ओबीसींचे अन्नत्याग आंदोलन ही संपवावे. - विरोधी पक्ष नेते,विजय वडेट्टीवार यांची मागणी


★ सरकार कडे कोणतेही काम नाही.


एस.के.24 तास


नागपूर : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात आरक्षणचा मुद्दा तापला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.ज्या पद्धतीने मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन मिटवले.त्याप्रमाणे ओबीसींचे आंदोलन सोडवण्याची भूमिका घ्यावी,असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.


आज नागपुरात बोलताना वडेट्टीवार म्हणाले,मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्याला ओबीसी समाजाचा विरोध नाही.परंतु ओबीसींच्या वाट्यातून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये,अशी ओबीसींची भूमिका आहे. मराठा समाजाला आधी चुकीच्या पद्धतीने आरक्षण देण्यात आले होते.आता कशा पद्धतीने सरकार त्यांना आरक्षण देतात ते बघावे लागेल. 


मात्र, जरांगे यांच्या मागणीवरून ओबीसी समाजात असंतोष आहे.ओबीसी युवक अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.ते आंदोलन मिटवण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी जावे.तसेही सरकारकडे कोणतेही काम शिल्लक नाही.त्यामुळे आंदोलनस्थळी जावून आंदोलन मिटवल्यास सरकार काहीतरी करीत आहे असे दिसेल आणि कौतुकाची थापही मिळेल,अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !