चारगाव येथे अपघातात एक पाय गमावलेल्या शेतकऱ्याला विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा आधार
एस.के.24 तास
सावली : दिनांक : १० सप्टेंबर २०२३ राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे चारगाव येथील गरीब शेतकरी,काँग्रेस कार्यकर्ता मा.चंद्रकुमार डोंगरे यांना आर्थिक मदत गावच्या सरपंच सौ.ज्योती श्रीकांत बहिरवार यांच्या हस्ते देण्यात आले.
मा.चंद्रकुमार डोंगरे हे अत्यंत गरीब,अल्पभूमी असलेले काँग्रेसचे चारगाव येथील कार्यकर्ता असून घरातील गरीब परिस्थितीमुळे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरणीर्वाह करीत होते. काही कामानिमित्य ते तालुक्याचा ठिकाणी सावली कडे येत असताना त्यांचा अपघात झाला व त्यांचा एक पाय पूर्णतः निकामी झाला.कुटुंब प्रमुखावर अशी घटना घडल्याने डोंगरे कुटुंबियावर आर्थिक संकट ओढवले पुढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांना मिळाली तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मंत्री मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क साधून डोंगरे कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी पंचायत समिती सभापती सावली मा.विजय कोरेवार,सावली नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सरपंच सौ.ज्योती बहिरवार,उपसरपंच मा.राजेश्वर वलके,नगरसेवक मा.नितेश रस्से, ग्राम पंचायत चारगावचे सदस्य मा.श्रीधर मेश्राम, सौ.निता दंडिकवार,सौ.निरोपा मडावी व मा.श्रीकांत बहिरवार उपस्थित होते.