व्यसनमुक्तीशी बंधन -व्यसनांपासून रक्षण' पोलिस अधीक्षक मा.रवींद्रसिह परदेशी यांना रक्षाबंधन करून व्यसनमुक्ती कायदा ची अंमलबजावणीची मागणी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील अडी अडचणींवर मात करून रक्षण, संरक्षण करण्या-यांचे आभार मानण्याचा दिवस पुरुषसत्ताक पद्धतीने याला एक अंगी म्हणजेच पुरुषांने स्त्रीचे संरक्षण करावे असे आणलेले आहे.परंतू या उत्सवाचा गाभा हा रक्षण, संरक्षण करण्या-यांना अभिवादन करने त्यांचे आभार मानणे हा आहे.रक्षाबंधन या उत्सवामध्ये एक प्रकारची बांधिलकी आहे.जी बांधिलकी तुमच्याकडून सातत्य अभिप्रेत करते आणि म्हणून हे असबंधन आहे की जे सातत्याने व्यसनापासून रक्षा करण्याची मागणी करते.
व्यसनमुक्त जिवनाशी बंधन व्हावे व व्यसनापासून रक्षा मनाच्या दृढ निश्चयाने करावी या साठी प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारे प्रमुख म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक यांना रक्षाबंधन करून आपण आमची रक्षा, संरक्षण करता म्हणून आम्ही आपले आभार व्यक्त करण्यासाठी व्यसनापासून रक्षण म्हणून राखी बांधून भविष्यात आम्हा सर्वांची व्यसनापासून संरक्षण करण्याची जबाबदारी आपण सन्मानाने स्विकारुन.
व्यसनमुक्ती कायदा ची अंमलबजावणी करण्याची आम्हाला भेट द्यावी अशी विनंती जिल्हा पोलिस अधीक्षक मा.रवींद्रसिह परदेशी यांना करण्यात आली.तसेच जिल्ह्यातील तरुणांचे व्यसनापासून संरक्षण करावे.अशी मागणी जनतेच्या वतीने संदिप कटकुरवार जिल्हा संघटक, नशाबंदी मंडळ चंद्रपूर यांनी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.या कार्यक्रमात श्री प्रकाश पालीवाल,संचालक झेप नई दिशा व्यसनमुक्ती केंद्र, दुर्गाताई पालीवाल,सपनाताई दिले,प्रफुल्ल लोणारे प्रकल्प समन्वयक उपस्थित होते.