श्री,गणेशा सार्वजनिक उत्सवमंडळ मचारणातर्फे रक्तदान शिबिर
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद क्षेत्र पोहरा अंतर्गत मौजा मचारना येथे दि.२४/०९/२०२३ रोज रविवार ला भाजपा अनु. जाती मोर्चा भंडारा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम यांचा नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री. गणेशा सार्वजनिक श्रीगणेश उत्सव मंडळ मचारना यांच्या वतीने आयोजित केलेला होता.
भाजपा तालुका अध्यक्ष श्रावणजी कापगते,सरपंच ग्रा. पं. मचारना .अचला संजय फटे,घनश्याम मते, देवेश नवखरे, प्रशांत मासुरकर,पोलीस पाटील लोमेश्वर कातोरे,मुख्याध्यापक श्रीराम फटे विद्यालय पोहरा प्रभुजी फटे सर, बुथ प्रमुख महेंद्र लुटे,भूषण नागलवाडे, शुभम प्रधान,संजय फटे यांचा उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यात.२३ रक्त दात्यांनी स्व इच्छेने रक्तदान केले.रक्तदान करणाऱ्या मध्ये.
भूपेश फटे,नीरज लुटे,महेंद्र लुटे,घनश्याम मते,जितेंद्र कडव, किरण कुमार शेंडे.,श्रीकृष्ण लांजेवार, लक्ष्मीकांत ठवकर,हिमांशू ठवकर. पतिराम फटे,प्रभुजी फटे सर,गणेश पगाडे, गोविंदा लांजेवार, गौरव लुटे, शुभम लांजेवार,अनिल कातोरे, सचिन दादा लांजेवार,धम्मदीप सोनटक्के, बबन गोटेफोडे, शुभम कडव, भूषण ढोके, डॉ. सरकार यांनी रक्तदान केले .समर्पण ब्लड बँक भंडारा नखाते, अंकिता वैद्य,डॉ.ओ.डी.बोरकर, पुनम गायकवाड,प्रकाश फटे,कादंबरी फटे यांनी सहकार्य केले.