केरोडा येथे भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाखाली वादळी ठरली केरोडा ग्रा.पं.ची ग्रामसभा ; ग्रामसभेत ग्रामस्थानचे उग्र रूप.
★ शिपाई भर्ती,डस्ट बिन,सायकल, मातीकाम आदी कामात भ्रष्टाचाराचा आरोप.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : विकास कामाच्या नावावर ग्रा.पं.प्रशासनाने अनेक कामात घोटाळा केला या सबबी खाली उपस्थित ग्रामस्थानी उग्र रूप धारण केल्याने केरोडा येथील ग्रामसभा वादळी ठरली २८ ऑगस्ट रोजी स्थगित झालेली ग्रामसभा ८ सेप्टेंबर रोजी घेण्यात आली.त्यावेळी गावातील हजारों ग्रामस्थानची उपस्थिति होती.स्वराज्य संस्थेचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा स्तर म्हणून ग्रामपंचायतला महत्व आहे यातूनच गावाचा विकास साधला जातो त्यात गावातील रस्ते,नाली,दिवाबत्ती, आरोग्य,प्राथमिक शिक्षण,पाणी पुरवठा,घरकुल आदी कामे ग्रामपंचायत च्या केली.
जाऊन गावाचा विकास केला जातो त्याही पलीकडे ग्राम प च्या विकासकामात पारदर्शकता यावी शासनाच्या जनकल्याणकारी योजना जनते पोहचाव्या आदि कामासाठी ग्रामसभेचे आयोजन केले अशाच ग्रासभेचे आयोजन ग्रामपंचायत केरोडा येथे करण्यात आले,या ग्रामसभेत विषय सुचीनुसार विषय घेण्यात येत असताना ग्रामपंचायत कमेटी व ग्रामस्थांना मध्ये आरोप प्रत्यारोपाचा सपाटा सुरु झाला,यामध्ये डस्टबिन खरेदी,शिलाई मशीन प्रशिक्षण,घोळ,लहान बालकांना सायकल खरेदी,मनरेगा अंतर्गत पांदण रस्ते,अपंग निधी परस्पर घोळ नाली मलमा सफाई १५ व्या वित्त आयोग अंतर्गत झालेल्या कामाची माहीति जनते पर्यंत येऊ शकली नाही.
बेरोजगार एस.सी,एस.टी साठी येणाऱ्या योजना आदी विविध कारणास्तव.ग्रामस्थांनी.ग्रा.पं.केरोडा मध्ये मोठा घोळ झाल्याचे ग्रामसभेत आरोप केल्या नंतर अनेक विकास कामात घोळ झाल्याचा आरोपाखाली सरपंच, उपसरपंच यांच्या वर ग्रामसभेत अविश्वास ठराव पारीत करण्यात आला,दरम्यान २५०० लोकसंख्या असलेल्या ९ सदस्यीय ग्रा.प केरोडा येथे कांग्रेस ची एकहाती सत्ता असताना ग्रामस्थांनी अनेक घोळ ग्रामसभेत समोर आणल्याने केरोडा ग्रा.पं.ग्रामसभा अत्यंत वादग्रस्त ठरली ,या सभेत बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान ग्रामविकासाच्या विकासात्मक योजना कमेटी मार्फत वाट लावण्याचा प्रकार.जर.सुरू असेल.तर.गावाचा विकास होणार का ?असा प्रश्न निर्माण करण्यात आला.ईतर कामात ग्रामपंचायतने त्यामुळे २८ आगस्ट ची स्थगीत ग्रामसभा ८ सप्टेंबर ला.घेण्यात आली.यात घोटाळ्याचा अनेक विकास कामात ठपका ग्रामस्थांनी ठेवला,त्यामुळे केरोडा ग्रा.पं.ग्रामसभा वादग्रस्त ठरली ,यावेळी बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
नुकात्याच झालेल्या ग्रा.पं.केरोडा च्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे गावकऱ्यांनी समोर आणले मी सुध्दा ग्रा.प.चा माजी सदस्य होतो, ग्रा.पं.प्रशासनात काय चालते याची कल्पना मला आहे त्यामुळे विद्यमान कमेटीत ग्रा.पं.अंतर्गत घोळ झाल्याचे दिसून येत आहे. - विजय उंदीरवाडे,माजी ग्रा.पं.सदस्य,तथा ग्रामस्थ ग्रा.पं.केरोडा ता.सावली जि चंद्रपूर
ग्रामपंचायत प्रशासन अंतर्गत झालेल्या विकास कामात कोणत्याही प्रकारचा घोळ झालेला नसुन विरोधकांनी केलेला.आरोप निरर्थक आहे, चुका तर माणसाच्या हातुनच घडतात,चुका झाल्या आहेत हे मी मान्य करतो. - ओमप्रकाश ढोलणे,प्रभारी सरपंच,ग्रा.पं.केरोडा ता.सावली जिल्हा,चंद्रपूर