अपयशातूनच यशाचा मार्ग मिळविता येतो- आयएफएस प्रथमेश तिजारे

अपयशातूनच यशाचा मार्ग मिळविता येतो- आयएफएस प्रथमेश तिजारे


एस.के.24 तास


चिमुर :  स्पर्धा परीक्षेच्या युगात स्वतःला सिद्ध करायचे असल्यास . वेळोवेळी आलेले अपयश यातूनच नियोजित अभ्यासक्रमाची बांधणी करून यश प्राप्त करता येते.असे मत आयएफएस प्रथमेश तिजारे यांनी व्यक्त केले. दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी ब्राईटएज फौंडेशन अंतर्गत सुरु असलेल्या मॅजिक उपक्रमाला त्यांनी भेट दिली.  त्यावेळी ते बोलत होते. 

प्रथमेशने अत्यंत गरीब परिस्थितीतुन आणि आईने केलेला संघर्ष या मिळालेल्या शिकवणीतून "भारतीय लोकसेवा आयोग -2022 मध्ये झालेल्या भारतीय वनसेवा परीक्षेत देशातून 85 वे स्थान प्राप्त केलेले आहे. भिवापूर येथील प्रथमेश तिजारे हा   यशोशिखर गाठलेला तरुण आहे. नुकतीच त्यांनी मित्रांनासोबत मॅजिकला भेट देऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.


यामध्ये त्यांनी मुलाखतीत येणाऱ्या अडचणी, सूक्ष्म अभ्यासक्रमातीला बारकावे, वेळेचे नियोजन, निर्णय क्षमता, प्रत्येक प्रश्नाचे स्वरूप आणि आपण केलेले प्रामाणिक प्रयत्न यावर मार्गदर्शन केले. त्यावेळी मॅजिकच्या माध्यमातून चालणारे विविध उपक्रमाची माहिती घेतली. हा सर्व उपक्रम आदिवासी व इतर लोकसहभागातून झालेल्या आर्थिक मदतीतून होतो. हेच खूप मोठ आश्चर्य माझ्यासाठी आहे. या उपक्रमाला आणि उपक्रमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्वरूपात सहकार्य करण्याची त्यांनी इच्छा दर्शवली


 कारगाव सर्कलचे जि प सदस्य शंकर दडमल यांच्या हस्ते यावेळी प्रथमेश यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक ऋण फेडण्याच्या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा केले. ब्राईटएज फौंडेशनचे उपाध्यक्ष संदीप खडसंग, विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष नन्नावरे सर, धोंडगाव येथील बाल गुरूदेव अभ्यासिका व मंडळ येथील विद्यार्थी व मॅजिक मधील विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !