सावली शा.औ.प्र.येथे मिनी मॅरेथॉन दौड स्पर्धा संपन्न.
★ तहसीलदार परिक्षित पाटील यांनी दाखविली हिरवी झेंडी : प्रशिक्षणार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
एस.के.24 तास
सावली : कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या सुचनेनुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली च्या वतीने पिएम स्कील रन मिनी मॅरेथॉन ( दौड स्पर्धा) तसेच आणि दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेतील १५३ प्रशिक्षणार्थ्यांनी या दौड स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.चकपिरंजी बस स्टॉप ते हिरापुर फाट्यापर्यंत आयोजीत पिएम स्कील रन या मॅरेथॉन दौड स्पर्धेला सावलीचे तहसीलदार परीक्षीत पाटील आणि चकपिंरजी च्या सरपंच उषा गेडाम यांनी हिरवी झेंडी दाखविली. या स्पर्धेत पुरुष गटातून रीतीक आलेवार प्रथम, मोहीत तिवाडे द्वितीय, केतन कोरेवार तृतीय तर महीला गटातून स्नेहा तिवाडे प्रथम, दिक्षा कावळे द्वितीय, शुभांगी कोलते तृतीय क्रमांक पटकाविला. दुपारच्या सत्रात दिक्षांत समारंभामधे त्यांचा मेडल, प्रमाणपत्र आणि बक्षीसाची रोख रक्कम देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
त्या चप्रमाणे दुपारच्या सत्रात पदवीदान समारंभात जुलै २०२३ मध्ये झालेल्या अ.भा. व्यवसाय परीक्षेत गुणवत्ता प्राप्त प्रशिक्षणांर्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यामधे प्रामुख्याने सचिन मनवर( विजतंत्री), पवन गंडाते (जोडारी), चेतन दडमल(डिझेल मेकॅनिक), सुधिर गेडाम( पी.ओ. सि. एम), प्रांजल सहारे (आर.ए.सी), दिपावली राऊत (सुईंग टेक्नॉलाजी), कैलाश चौधरी )विजतंत्री), रोहीत हुड (आर.ए.सी) इत्यादी उत्तीर्ण प्रशिक्षणांर्थ्यांचा समावेश होता.
आय. टी .आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराबाबत वेळोवेळी निर्माण होणाऱ्या संधीबाबत संस्थेचे प्राचार्य एन.एन.गेडकर यांनी मार्गदर्शन करून पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्यात.या कार्यक्रमात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संस्थेत राबविण्यात येणाऱ्या 'स्वच्छता व देखभाल पंधरवाडा' या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास चकपिरंजी गावच्या सरपंच उषा गेडाम,पत्रकार उदय गडकरी,आशिष दुधे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक गिरीश बारसिंगे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निदेशक भावना उके यांनी केले तर आभार प्रदर्शन सबुरी नंदगीरवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.