गांधीजीं च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखा संघ,मुल पुण्यभूमीतून जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ.

गांधीजीं च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखा संघ,मुल पुण्यभूमीतून जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानव्ये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ मुल येथील गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखा संघ पुण्यभूमीतून काँग्रेस नेते सी.डी.सी.डी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला.मुल येथून निघालेल्या पदयात्रेत काँग्रेसचे महिला,पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते,काँग्रेस प्रेमी बहुसंख्येने सहभागी झाले होते.


लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ह्या जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत मुल,कोसंबी, मारोडा,आदर्शखेडा, उसराळा, भादुर्ना लोकांशी संवाद साधला. भादूर्णी येथे पदयात्रेचे विक्रम गुरनुले यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी धूम धडाक्यात स्वागत करुन चौकात सभा घेण्यात आली. सभेला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.तालुका अध्यक्ष,गुरु गुरनुले,ओबीसी राज्य सरचिटणीस,गुरुदास चौधरी, यांनी नागरिकांशी संवादात्मक मार्गदर्शन केले.मंगेश बत्तुलवार यांनी आभार मानले. 


पदयात्रेत काँग्रेस नेते संतोष सिंह रावत,कृ. ऊ.बा.स.सभापती राकेश रत्नावार, संचालक व माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर, सेवादलाचे ज्येष्ठ नामदेवराव गावतूरे, शशिकला गावतूरे, संचालक संदीप कारमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, ग्रामीण काँग्रेसचे राजू पाटील मारकवार, माजी सभापती दशरथ वाकुडकर, युवक काँग्रेस अध्यक्ष,पवन नीलमवार, दीपक पा. वाढई, सरपंच चांगदेव केमेकर, संचालक हसन वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, संचालक किशोर घडसे, लहू कडस्कर, विनोद कांमडे, औद्योगिक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ,राजेंद्र वाढई,गुलाब पठाण, शहरउपाध्यक्ष संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, शहर महासचिव कैलास चलाख,गंगाधर घुगरे,महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार,माजी नगरसेविका,लीना फुलझेले,सचिव,शामला बेलसरे, कोषाध्यक्ष,राधिका बुक्कावार,सदस्या फर्जणा शेख,नाजुका लाटकर, समता बनसोड,व इतर महिला, युवक शहर अध्यक्ष,व्यंकटेश पल्लकवार व दहा युवकांची टीम,चीचाळा येथील मंकीवार व त्याची टीम, चंदू चटारे, रामदास गुरनुले,भाऊजी लेनगुरे, संदीप वाढई, छोटू रावत,राजेश गावतुरे, गुज्जनवार,विनोद कामडे, सरपंच रवी कामडे,उपसरपंच साहिल येनगनटीवार, शेख,संचालक जवादे,यांचेसह तालुका व शहर,काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते,बहुसंख्येने उपस्थित होते. 


पदयात्रेची सांगता कोसंबी सरपंच रवींद्र कामडे यांनी दिलेल्या भोजनाने झाली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !