चंद्रपुर येथे झालेल्या सबज्युनियर व ज्युनियर जिल्हा अँथलेटिक्स स्पर्धेत पी.आर.डी.स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे अभूतपूर्व यश ★ १६ गोल्ड,१५ सिल्वर,१० ब्रॉन्ज़ ऐकुन ४१ मेडल मिळविले.


चंद्रपुर येथे झालेल्या सबज्युनियर व ज्युनियर जिल्हा अँथलेटिक्स स्पर्धेत पी.आर.डी.स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे अभूतपूर्व यश


★ १६ गोल्ड,१५ सिल्वर,१० ब्रॉन्ज़ ऐकुन ४१ मेडल मिळविले.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक.


ब्रम्हपुरी : दिनांक,०४/०९/२३ चंद्रपुर जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे विसापूर येथील  अटलबिहारीं वाजपेयी क्रीडा संकुल येथे  दि.२ व ३ सप्टेंबर २०२३ ला आयोजित जिल्हास्तरीय अँथलेटिक्स स्पर्धेत पी.आर.डी.स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी च्या विद्यार्थ्यांनी १६ गोल्ड ,१५ सिल्वर,१० ब्रॉन्ज़ मेडल असे ऐकून ४१ पदक  मिळविले ज्यामध्ये ८ वर्षाआतील मुलींच्या गटात  नव्या लंजे हिने लांबउडी मध्ये प्रथम क्रमांक व ५०,८० मीटर दौड़ स्पर्धेत मध्ये द्वितीय क्रमांक पटकवीला तर अधीरा गावतुरे हिने लांबउडी मध्ये द्वितीय व ५०,८० मीटर दौड़ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकविला १० वर्षाआतील मुलींच्या गटात  


स्नेहल फटिंग हिने ५०,१०० मीटर दौड़ स्पर्धेत प्रथम तर १० वर्षाआतील मुलींच्या गटात आस्था चौधरी हिने ५०व१०० मीटर दौड़ स्पर्धेत द्वितीय व लांबउडी मध्ये तृतीय ,१० वर्षाआतील मुलांच्या गटात लांबउडी स्पर्धेत चिन्मय भेदे त्याने प्रथम तर 


नकुल मेहेर याने ५० मीटर दौड मध्ये प्रथम व लांबउडी मध्ये द्वितीय तर ५० मीटर दौड मध्ये विहान रामटेके  याने १२ वर्षाआतील मुलांच्या गटात लांबउड़ी मध्ये क्रीष्णानंद डोंगरवार प्रथम  रौनक गेडाम द्वितीय , वृषभ धांडे तृतीय १२ वर्षाआतील मुलांच्या गटात गोळाफेक मध्ये आलाप शिवुरकर प्रथम, श्रीनू सोनकुसरे द्वितीय तर वेदांत नाकाडे तृतीय ,१४ वर्षाआतील मुलांच्या गटात गोळाफेक व भालाफेक मध्ये अजिंक्य आत्राम प्रथम,प्रज्ञेश  मुनघाटे तृतीय १४ वर्षाआतील मुलींच्या गटात गोळाफेक मध्ये कशीष शेडमाके प्रथम व भालाफेक द्वितीय तृतीय १६ वर्षाआतील मुलांच्या गटात गोळाफेक ,


थालीफेक , भालाफेक क्रीड़ाप्रकारात प्रसाद धकाते द्वितीय तर  भालाफेक मध्ये यश मेश्राम तृतीय ,१६ वर्षाआतील मुलींच्या गटात १०० मीटर दौड़ स्पर्धेत व लांबउडी मध्ये  मोना पिलारे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला  व ३०० मीटर दौड़ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला १०० व २०० मीटर दौड़ स्पर्धेत १८ वर्षाआतील मुलींच्या गटात सानिया नरूले हिने प्रथम क्रमांक पटकविला.


 तर ८०० मीटर व १५०० मीटर दौड़ स्पर्धेत २० वर्षाआतील मुलींच्या   गटात जान्हवी हजारे हिने द्वितीय क्रमांक पटकविला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपल्या पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चे संस्थापक व क्रीडाप्रशिक्षक राहुल जुआरे सर,सहप्रशिक्षक मनोज गेडाम सर,कुंदन गायकवाड सर ,स्नेहल राऊत मँडम यांना दिले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !