शेतात बॅटरी व विद्युत ताराचा प्रवाहाने वन्य प्राण्यासह दोन शेतकरी ठार.
एस.के.24 तास
नागभीड : नागभीड शेतशिवारात विद्युत तारांच्या स्पर्शाने वन्यप्राण्यासह दोन शेतकरी ठार झाल्याची घटना घडली. गुरुदास श्रीहरी पिसे (५२) व देवनाथ रामदास बावनकर (४५) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.नागभीड शहराला लागून शेताशिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस घातला आहे. शेतकरी वनविभागाकडून दिल्या जाणाऱ्या ‘झटका मशीन’ऐवजी कुंपण तारांना विद्युत प्रवाह सोडून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत असतात.
नारायण लेणेकर यांनी आपल्या शेतात बॅटरी व विद्युत ताराचा प्रवाह सोडला. या प्रवाहाचा स्पर्श झाल्याने रानडुक्कर ठार झाले. सोबतच बाजूलाच शेत असलेल्या गुरुदास श्रीहरी पिसे वय,५२ रा.नागभीड यांचाही विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. नारायण लेणेकर यांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुसरी घटना नागभीड शेतशिवारातच घडली. विजेच्या धक्क्याने देवनाथ रामदास बावनकर यांचा मृत्यू झाला.