मुल तालुक्यातील टेकाडी या गावापासून काँग्रेसच्या जनसंवाद पद यात्रेला प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) यांच्या नेतृत्वात सुरुवात.

मुल तालुक्यातील टेकाडी या गावापासून काँग्रेसच्या जनसंवाद पद यात्रेला प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) यांच्या नेतृत्वात सुरुवात.


एस.के.24 तास


मुल : तालुक्यातील  टेकाडी या गावापासून  काँग्रेसच्या जनसंवाद पद यात्रेला प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर) यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली. या यात्रेमध्ये गावातील काँग्रसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते,नंतर या यात्रेचे सभेमध्ये रुपांतर झाले. सभेला प्रकाश पाटील मारकवार,अजिंक्य प्रकाश पाटील (उपाध्यक्ष जिल्हा कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभाग चंद्रपूर ) यांनी संबोधित केले.सभेला प्रभाकर पाटील बोमनवार,संतोषावार गुरुजी,शरद गणवीर,रमेश घडसे,नरेंद्र चौधरी,भावेश रामटेके,व गावाती ल  कार्यकर्ते उपस्थित होते. 


पद यात्रेमध्ये खालील समस्यांविषयी जनतेशी संवाद साधण्यात आला.


१) महागाई कमी करणे, भ्रष्टाचाराचे निर्मूलन करणे.


२) जीवनावश्यक वस्तूवरील GST दर शून्य करणे.


३) शेतीला विजपुरवठा दर अत्यल्प करणे.


४) शेती आधारीत पूरक उद्योगांना प्रोत्साहन देणे.


५) बेरोजगारी कमी करण्यासाठी युवकांना भांडवल उपलब्ध करणे.त्यासाठी प्रोत्साहन व सहाय्य करणे.


६) शेतमालाला हमी भाव देणे.


७) जाती निहाय जनगणना करणे.


८) महिला वरील अत्याचार रोखण्यासाठी कायदे कडक करणे.


९) परदेशातील उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती देणे.


१०) मजूर, कारागीर ,कुशल कामगारांना प्रशिक्षण देणे व आत्मनिर्भर करण्यासाठी भांडवल उपलब्ध करणे.


११) शेती आणि वन आधारीत कुटीर उद्योग उभारणीसाठी स्वायत्त संस्था स्थापन करणे.


१२) मच्छिमार सोसायट्यां ना सहाय्य करणे, गरीब वंचित घटकांना स्वावलंबी बनविणे.


१३) बारमाही जलसिंचनासाठी प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करणे.नदी ,तलाव जोडून अधिकाधिक शेती सिंचन क्षेत्र वाढविणे.


१४) रेल्वेमार्गा चा विकास करणे, मोठ्या शहरांना जोडणाऱ्या प्रवासी गाड्यांची संख्या वाढविणे, प्रवासी वाहतूक जलद आणि तत्पर बनविणे.


१५) पर्यटन स्थळांचा विकास करणे, गावातील लोकांना होमस्टे करिता घरे बांधून देणे, पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांचे अधिकार ग्रामीण गटांना देवून खेड्यांना आत्मनिर्भर बनविणे, कृषी पर्यटनाला चालना देणे.


१६) प्रत्येक व्यक्तीला शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे.


१७) बागायती शेती,नगदी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन मार्गदर्शन करणे.


१८) गाव खेड्यांना दत्तक घेऊन CSR निधी, न्यायनीधी औद्योगिक आस्थापना यांचे द्वारा प्रोत्साहन व मार्गदर्शन करून स्वावलंबी बनविणे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !