शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदवीदान समारंभ संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अ.भा. व्यवसाय परिक्षेत गुणानुक्रमे व्यवसाय निहाय प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन फेडरेशन ऑफ इंडस्ट्री असोसिएशन विदर्भ चे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांचे हस्ते झाले तर संस्थेच्या आयएमसी चे अध्यक्ष सनविजय अलाय एन्ड पावर लिमिटेड चे हेड आफ प्लन्ट सी. एम. राव यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते. सिपेट वर्कशॉप मध्ये आयोजित या कार्यक्रमात सुरूवातीला स्वच्छता पंधरवडा चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी यावर मधुसूदन रूंगठा यांनी विचार मांडले तर प्रशिक्षणार्थ्यांनी आपली व्यवसाय कौशल्ये अधिक उन्नत केली असे विचार सि. एम.राव यांनी व्यक्त केले.
पदवीदान समारंभात संस्थेतून प्रथम इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व्यवसायाचा जस्वीर कुमार,द्वितीय क्रमांक टर्नर व्यवसायाचा संजीव पंडित तर तृतीय क्रमांक स्टेनो व्यवसायाचे उन्मेश वांढरे यांना सन्मानित करण्यात आले. दोन वर्षीय अभ्यासक्रमात वैभव मुंडे( वीजतंत्री), जस्वीर कुमार (इलेक्ट्रॉनिक्स),आकाश घोंगे(फिटर),प्रणय मडावी(आयसीटीएम), प्रज्वल रायपुरे (मशिनिष्ट), प्रीतम सोनुले(मोटार मेकॅनिक),रोहन झाडे(ए एम टीएम ),लितेश बावणे (ओएएमटी,) अफताब शेख (आरएसी),संजय पंडित (टर्नर),अर्पिता आवळे (वायरमन) हे आपापल्या व्यवसायात प्रथम आलेत तर एक वर्षीय अभ्यासक्रमात गौरव दुरटकर, दीपा निंदेकर, तनवी रामटेके, कुणाल गाडगे, मोहम्मद खान ,सुमित कामडे,आदित्य सोनुले,साक्षी खांडारकर,उन्मेश वांढरे,रित्विक मांढरे इत्यादींना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिदेशक जितेंद्र टोंगे यांनी केले.या कार्यक्रमास गटनिदेशक बोकडे, बंडोपंत बोढेकर,सौ.गभणे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन गटनिदेशक सौ.सुचिता झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश रोडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व निदेशक कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.