चंद्रपूर मध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते लिंबू पाणी पाजून रविंद्र टोंगे यांचे उपोषण मागे.

चंद्रपूर मध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते लिंबू पाणी पाजून रविंद्र टोंगे यांचे उपोषण मागे.


एस.के.24 तास


चंद्रपूर : मराठा आरक्षणासाठी जालन्यातून मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मराठ्यांच्या ओबीसी समावेशाला विरोध करत चंद्रपुरात रवींद्र टोंगे यांनीही आमरण उपोषण सुरू केलं होतं. तब्बल 21 दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण आज मागे घेण्यात आलं आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मध्यस्थी अखेर यशस्वी ठरली.


फडणवीसांनी काय आश्वासन दिलं ?


मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं,अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर मराठ्यांचा ओबीसीत समावेश नको, अशी मागणी ओबीसी संघटनांकडून सुरू झाली. रवींद्र टोंगे यांनी हीच मागणी लावून धरत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.


 'मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र हे आरक्षण दिलं जात असताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही. तसंच ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसींसाठी सुरू असलेल्या विविध योजनांसाठी सरकारकडून भरीव आर्थिक मदत केली जाईल,' असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !