देव देते आणि निसर्ग नेते.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : १७/०९/२३ मध्य प्रदेश मध्ये झालेल्या अति जलप्रलयाचा परिणाम भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द धरणावर झाला .त्यामुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगून व जनतेला वारंवार सूचना देऊन गोसे खुर्द धरणाचे पाणी सोडले. त्यामुळे वैनगंगा नदी दुधडी भरून वाहू लागली आणि हळूहळू तिने रौद्ररूप धारण केले.
नदी काठच्या गावांना पुराच्या पाण्याने वेढले आणि पाहता पाहता गावात आणि शेत शिवारात पाणी झाले.आलेल्या या पुरामुळे शेत शिवारात असलेल्या भाजीपाला आणि धानाचे, सोयाबीन चे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसर्गाने हीराहून घेतला. कारण धानाचे पीक हे निसवलेले आहे आणि ऐन निसावणीच्या पर्वावर पुराचे पाणी शेतकऱ्यांचे शेतात शिरल्यामुळे उभे धानाचे आणि सोयाबीनचे पीक पूर्णता बुडालेले आहे. यात शेतकऱ्यांचेअतोनात नुकसान झाले.
म्हणून म्हणतात- " देव देते आणि निसर्ग नेते "
कसा होईल बळीराजा सुखी.. वारंवार त्याच्या नशिबाला दुःखच दुःख आणि यातना...
हे सर्व स्वतःभोगून दुसऱ्याला आनंद देण्यातच सारे जीवन उध्वस्त करतो...
झालेल्या नुकसानीची आता डोळे वर करून सरकार काय, किती आणि कोणती मदत,घोषणा करते याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.