संततधार पावसामुळे बेंबाळ परिसरातील अनेकांच्या घरांची पडझड.
★ सरपंच,उपसरपंच केली कोसळलेल्या घरांची पाहणी.
★ शासनाकडून केली मदतीची मागणी.
उपसंपादक - नितेश मॅकलवार
मुल : तालुक्यातील बेंबाळ येते कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील अनेकांच्या घराची नुकसान झाल्याचे वृत्त आहे तर अनेकांची घरे पडली, तर काहींची घरे गळतीमुळे चिखलमय झाली आहेत. मुल तालुक्यातील बेंबाळ येथील प्रभाकर मोहरले, कालिदास जी कुंभारे, वामन ध्यानभोईवार, यांचे घर अति पावसामुळे कोसळले. त्यामुळे त्यांच्या घरातील वस्तूंची नासधूस आणि नुकसान झाली आहे.
या घटनेची माहिती ग्रामपंचायतीला मिळताच सरपंच चांगदेव केमेकर आणि उपसरपंच देवाजी ध्यानभोईवार,ग्रामपंचायत सदस्य कविताताई नंदीग्रामवार,अरुणाताई गेडाम, आशाताई शेंडे, आशाताई मडावी,यांना होताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होत पडलेल्या घराची पाहणी केली. त्यांना शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याची हमी दिली.
वस्ती करण्याचे घर पडल्यामुळे आपातग्रस्त कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे.अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेने तात्काळ पाहणी करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच चांगदेव केमेकर,उपसरपंच देवाजी ध्यानभोईवार,व ग्रामपंचायत कमिटी यांनी केली आहे.