सिडको मुख्य नियंत्रक दक्षता विभागाची अनाधिकृत बाधकामावर धडक कारवाई.
एस.के.24 तास
नवी मुंबई : (प्रतिनिधी : दशरथ कांबळे) सिडको अधिकारी यांच्या निर्देशानुसार व मा. मुख्य नियंत्रक सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागामार्फत घनसोली डी मार्ट, नवी मुंबई समोर सेक्टर १६ सर्व्ह न.४७ अनधिकृत बांधकाम आरसीसी सुरू होते . इमारत अनाधिकृत बांधकाम तोडण्यात आलेले आहे येथे निष्कासन मोहिम राबवून असलेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.वर नमूद अतिक्रमणे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली असल्यामुळे निष्कासित करण्यात आली.
सदरची मोहीम मा. मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार व मा. मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधिकारी व पोलिस संरक्षण , अधिकारी, पोलीस कर्मचारी, सिडको पोलीस पथक, सिडकोचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली.