शासकीय व निमशासकीय नोकरदार भरतीच्या कंत्राटी करणाचा जी आर रद्द करा. - वंचित बहुजन आघाडी
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : राज्य सरकारी कर्मचारी खाजगी करण करणारा व कॉन्ट्रॅक्ट वाव देणारा आणि घटनेच्या मूलभूत तत्त्वाचा उल्लंघन करणारा शासकीय निमशासकीय नोकर भरतीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत खाजगी सेवा पुरवठादार एजन्सी मार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता 6 सप्टेंबर 2023 च्या महाराष्ट्र शासनाच्या जीआर निर्णय रद्द करा.
भरतीचे कॉन्ट्रॅक्ट 9 खाजगी कंपन्यात देण्यात आलाआहे त्यामुळे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांवर उपासमार होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट कोणत्याही खाजगी कंपन्यांना देण्यात येऊ नये व खाजगी कंपनीने कॉन्टॅक्ट देण्याचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो जीआर रद्द करण्यात यावा.
अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे आंदोलन करण्यात या इशारा देण्यात आला आहे त्या बद्दल चे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलेल्या हे निवेदन जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी.जी.रंगारी यांच्या नेतृत्वात देण्याचा आले असून निवेदन देतेवेळी,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी,तालुका सचिव अमित नागदेवे,शीतल नागदेवे, यादवराव गणवीर,धम्मज्योती राऊत,स्वर्णमाला गजभिये,संतोष लांडगे,ब्रिजलाल राऊत,सुक्राम बहेकार व बहुसंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.