अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१९/०९/२३ ब्रह्मपुरी व परिसरात नव्याने सुरु करण्यात आलेल्या "विदर्भ रोशन" या साप्ताहिक वृत्तपत्राचा लोकार्पण सोहळा तालुक्यातील नामवंत व ज्येष्ठ पत्रकार बंधूच्या हस्ते दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोज सोमवारला ब्रह्मपुरी येथील स्थानिक शासकीय विश्रामगृहात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर- नवरगाव येथील रहिवासी साप्ताहिक " विदर्भ रोशनचे " संपादक तथा मालक रोशन रामभाऊ मदनकर यांच्या तर्फे या लोकार्पण सोहळ्याच्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय मुळे सर,तर प्रमुख अतिथी म्हणून जीवन बागडे,प्रा.शिवराज मालवी सर, अमरदीप लोखंडे सर,रोशन मदनकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.यावेळी पत्रकारितेचा क्षेत्रातील संपादक पदाबद्दल असलेला दांडका अनुभव ज्येष्ठ मान्यवरांनी विशद केला व विदर्भ रोशन या वृत्तपत्राला देशात उंच भरारी मारण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाला पत्रकार दीपक पत्रे, दत्तात्रय दलाल, गोवर्धन दोनाडकर,विनोद दोनाडकर, राहुल भोयर, राहुल मैन्द,संतोष पिलारे,प्राध्यापक श्याम करंबे,कृष्णा वैद्य,विनोद चौधरी,रवी चामलवार,नंदू गुड्डेवार,प्रा.प्रशांत डांगे, यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.या प्रसंगी बरेच पत्रकार बंधू उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत डांगे यांनी तर आभार प्रा. संतोष पिलारे, यांनी मानले .