पोषण अभियान कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
कोरपना : दिनांक,01 सप्टेंबर 2023 ला अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही उत्तम कपुस उपक्रम (BC) अंतर्गत INMH01 मधील वडगाव येथे पि यु मॅनेजर दीपक साळवे सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. त्या मध्ये गावातील शेतकरी पुरुष, शेतकरी महिला, व शालेय विद्यार्थी यांना पोषण आहार ( भरड धान्य/ तृणधान्य ,)इ. बद्दल जनजागृती रॅली( घोषवाक्य लावून बोर्ड द्वारे, नारे देऊन)तृणधान्य पासुन पोषण आहार, प्रत्यक्ष तृणधान्य दाखवून खालिल विषयावर माहिती देण्यात आली.
1) तृणधान्याची ओडख करून माहिती देण्यात आली. यामध्ये ज्वारी, बाजरी, राडा , वाणी, नाचणी, राजगिरा यांचा समावेश होता.
2) पोषन आहारचे महत्व.
3) पोषन आहारासाठी तृणधान्याची प्रात्यक्षिक करण्यात आले. यामध्ये मका वडे, ज्वारीची आमटी, ज्वारी भाकरी, मक्याचा उपमा, ज्वारीच्या कण्या, ज्वारी उसळ, ई. महिलांनी तयार करून आणलेली प्रात्यक्षिक ठेवण्यात आली.
4) पुढील काळातील आरोग्य साठी तृणधान्याची गरज या विषयी माहिती देण्यात आली.
5) रासायनिक कीटकनाशकांमुडे मानवी व पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम या विषयी जागृती करण्यात आली.
6) तृणधान्य मधे फायबर चे प्रमाण अधिक असल्याने मानवी आरोग्यास लाभदायक असल्याचे सांगितले.इ.माहिती देण्यात आली.
पोषण आहार प्रात्यक्षिक स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्य.पोलिस पाटील मॅडम.तंटामुक्त अधक्ष साहेब. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद,आरोग्य विभागाच्या सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह कल्पना भेंडे मॅडम.पि.यू . मॅनेजर - दीपक साळवे सर.इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी PU 01 चे सर्व प्रक्षेत्र अधिकारी नालंदा बोथले, प्रियंका झाडे, रूंदा हनुमंते, रमेश लोनबले, व्यंकटेश झूरमुरे, सुमित कुंभार, आणि आरोग्य सखी उपस्थित होते.