मुल नगरपालिकेचे कार्यशील मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची अचानक बदली.
नितेश मँकलवार - उपसंपादक
मुल : नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची आज तडपातर्फी बदली झाली.अजय पाटणकर मुख्याधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर एक वर्ष ही मूलमध्ये सेवा देऊ शकले नाही हे उल्लेखनीय.त्यांची बदली सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगर परिषदेमध्ये झाली आहे.
अजय पाटणकर यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर कुणाची मिळते ते याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.याबाबत पाच सप्टेंबर रोजी नगर विकास प्रशासनाने बदलीचे आदेश काढले असून प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे.