विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चा ४६ वा वर्धापण दिन उत्साहात साजरा.
★ संघटनेच्या वार्ता फलकाचे अनावरण तसेच वृक्षारोपण उपक्रम.
अमरदीप लोखंडे,सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०६/०९/२३ विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना विभाग, ब्रम्हपुरी तर्फे वर्धापन दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानिमित्त विभागिय कार्यालयासमोर संघटनेच्या वार्ताफलकाचे अनावरण मा.अजय कोलते साहेब कार्यकारी अभियंता, यांचे शुभहस्ते करण्यात आले .याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.खडतकर साहेब,अति.कार्यकारी अभियंता,मा.मेश्राम साहेब उपकार्यकारी अभियंता, बि.बि.डोळस, युवराज कोडापे, झोन प्रतिनिधि, शिरिष राऊत झोन प्रतिनीधी,
नितीन सोनकुसरे,आपरेटर संघटना,एम.जी.चिचघरे माजी झोन प्रतिनीधी,आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सुनिल पाकलवार विभागिय सचिव यांनी केले. तर,मा .कोलते साहेब यांनी कंपनीची सद्यस्थिती व कामगाराची भुमिका यावर मार्गदर्शन केले,तर मा.खडतकर साहेब ,मा,मेश्राम साहेब यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले,नितिन सोनकुसरे यांनी सामाजिक उपक्रमाचे महत्व सांगितले तर .युवराज कोडापे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे महत्व व भुमिका विशद केली. तदनंतर ३३के्.व्हि.उपकेंद्र देलनवाडी, 33केव्हि.उपकेंद्र खेड येथिल परिसरात संघटनेच्या वतिने वृक्षारोपण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास, संघटनेचे सर्कल, अध्यक्ष आर.जे.बघेल,उपाध्यक्ष,आर.के.मेश्राम,पतसंस्थेचे अध्यक्ष जि.एम.कोहळे,संतोष मेश्राम,डि.जे.दुधबळे,निकेश धकाते,सुर्यकांत सडमाके,महेश बनकर,पिदुरकर,दिनेश दुबे,सुभाष नंदनवार , गणेश करणकर,छत्रपती हुलके,मोरेश्वर घोडमारे,जि.एम.दोडके, जयराम राऊत,विठ्ठल सोमनकर,तसेच बहुसंख्येने संघटनेचे पदाधिकारी सभासद उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचलन सर्कल सचिव कृष्णा ईन्कणे यांनी केले तर आभार पतसंस्थेचे अध्यक्ष जि.एम .कोहळे यांनी मानले.सामुहिक भोजन करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.