शा.औ.प्र.संस्थेत रोजगार भरती तथा अप्रेंटिस मेळाव्याचे आयोजन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे विविध व्यवसायाच्या उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोजगार भरती तथा अप्रेंटिस मेळाव्याचे आयोजन येत्या १४ सप्टेंबर रोजी दुपारी अकरा वाजता कौशल्यम सभागृहात करण्यात आलेले आहे.
मारूती सुझुकी मोटर आणि धूत ट्रान्समिशन या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असून ते मुलाखती घेणार आहे. तरी फिटर ,टर्नर, वेल्डर, मशिनिष्ट , मोटर मेकॅनिक,पीपीओ, सिओई (अटोमोबाईल ), पेंटर जनरल ,डिझेल मेकॅनिक इलेक्ट्रिशियन, टूल ऍण्ड डाय मेकर या व्यवसायात उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी कागदपत्रासह मेळाव्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केलेले आहे.