शासकीय औ.प्र.संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना दिवस संपन्न. ★ रासेयो हे युवकांमध्ये राष्ट्रीयत्वची भावना विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ. - अजय चंद्रपट्टण

शासकीय औ.प्र.संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना दिवस संपन्न.


★ रासेयो हे युवकांमध्ये राष्ट्रीयत्वची भावना विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ. - अजय चंद्रपट्टण


एस.के.24 तास


चंद्रपूर : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकांमध्ये सामाजिक सेवेची जाणिव निर्माण करून त्यांच्यात राष्ट्रीयत्वची भावना निर्माण करणारे प्रभावी व्यासपीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग असल्याचे प्रतिपादन रासेयो राज्य पुरस्कार प्राप्त अजय चंद्रपट्टण यांनी केले.ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे सिपेट वर्कशॉप मध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. 

संस्थेतील  रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना ही आता युवकांसाठी दिशादर्शक चळवळ ठरली असून त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रासेयो चे विविध उपक्रम सहाय्यक ठरत असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष गटनिदेशक जितेंद्र टोंगे यांनी जीवनात सेवेचे महत्त्व सांगून कोरोना काळातील स्वानुभव ऐकवत रासेयो दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.


 विचार पिठावर रासेयो सह कार्यक्रम अधिकारी महेश नाडमवार, रासेयो समिती सदस्य अभय घटे, गटनिदेशक रमेश रोडे, निदेशक रणदिवे , कोठारकर आदिंची उपस्थिती होती. यावेळी सत्र २०२३-२४ या कालावधीसाठी रासेयो  समिती गठीत करण्यात आली, त्यात निदेशक अभय घटे,श्री.लांडगे, कु.माकोडे, कु. वाघाडे यांची निवड करण्यात आली. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांमधून लवकरच रासेयो  प्रतिनिधी निवडण्यात येईल,असे याप्रसंगी सांगण्यात आले.


   स्वयंसेवक प्रतिनिधी कु.रिया पिपरीकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार कु.कोमल बावरे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !