१ कोटी ११ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, ‘या’ तंबाखू तस्कराचे नाव चर्चेत.
एस.के.24 तास
चंद्रपूर : राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची जिल्ह्यात तस्करी सुरू असून बल्लारपूर टोल नाक्यावर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नागपूर व अमरावतीच्या दक्षता विभागच्या पथकाने १ कोटी ११ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त केला. या कारवाईनंतर बल्लारपूरचा गुटखा किंग ‘जयसुख’चे नाव चर्चेत आले आहे.
नागपूर व अमरावतीच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की कर्नाटकमधून सुगंधित तंबाखू ट्रकमधून तस्करी होत आहे. माहिती मिळताच दोन्ही दक्षता टीमने संयुक्त कारवाई करीत विसापूर टोल नाक्यावर खबरीने दिलेल्या माहितीनुसार दोन ट्रक पकडले. ट्रक चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ट्रकमध्ये पोहे असल्याचा दावा करीत होता. पण त्या ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू असल्याने वरचा तरपाल उघडल्याने त्यात कोटी रुपयांचा माल मिळून आला. दोन बारा चक्का ट्रकला पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे आणून तपास केला तर पांढऱ्या पलास्टिकच्या शेकडो बोऱ्यात सागर नावाचा सुगंधित तंबाखू आढळून आला. तंबाखूची अंदाजित किंमत एक कोटी अकरा लाखांपेक्षा जास्त असू शकते, अशी माहिती नागपूरचे दक्षता विभागटे (विंजिलेन्स) अन्न व औषधी विभागचे अधिकारी यांनी दिली.