प्रामाणिकपणा व सचोटी हे यशाचे गमक. - विनोद कावळे
★ आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिवस.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०१/०९/२३ " कोणताही उद्योग करतांना त्या उद्योगात आपण आपला प्राण ओतला पाहिजे.आज स्पर्धा,धकाधक आहे त्यामुळे प्रामाणिकपणा व सचोटी हे तुमच्या यशाचे गमक आहेत " असे विचार प्रसिद्ध उद्योजक विनोद कावळेनी विचार मांडले.
ते ने.हि.महाविद्यालयात ' आंतरराष्ट्रीय उद्यमिता दिवस ' निमित्त मार्गदर्शक म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर उपस्थितीत वाणिज्य विभागप्रमुख डॉ रेखा मेश्राम, डॉ असलम शेख, डॉ मोहन कापगते, डॉ योगेश ठावरी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून ' मी उद्योजक होणार!' यावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी याला भरभरुन प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ,भास्कर लेनगुरे,संचालन विवेक नागभिडकर तर आभार प्रा जयेश हजारेनी मानले.कार्यक्रमाला डॉ तात्याजी गेडाम, डॉ धनराज खानोरकर,डॉ राजू आदे,प्रा आकाश मेश्राम,प्रा राकेश मेश्राम,प्रा कुंदा तोंडरे,प्रा सुमित पारधी इ.मान्यवर उपस्थित होते.