अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीची मोर्चाची जय्यत तयारी. ★ 5 ऑक्टोंबरला गडचिरोली येथे कुणबी महामोर्चाचे आयोजन.

अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीची मोर्चाची जय्यत तयारी.


★ 5 ऑक्टोंबरला गडचिरोली येथे कुणबी महामोर्चाचे आयोजन.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक.


ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०९/२३ मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास कुणबी समाजाचा विरोध तीव्र विरोध आहे. कुणबी हा ओबीसी प्रवर्गातील सर्वाधिक संख्या असलेला घटक आहे.मराठा समाजाला आरक्षण देण्याला कोणाचाही विरोध नाही.पण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.तसेच बिहारच्या धर्तीवर राज्यात सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. महामहिम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यासह इतर १२ जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ओबीसींचे १७ संवर्गीय पदाचे आरक्षण शून्य झाले असून हे असंविधानिक आहे. हा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय असून तो तात्काळ दूर करण्यात यावा. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात येऊन सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये.


सारथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तात्काळ सुरू करण्यात याव्यात. अल्पसंख्यांक संस्थांना त्यांच्या आस्थापनेतील रिक्त पदभरतीसाठी देण्यात आलेली सूट, बहुजन समाजातील संस्थांना सुद्धा देण्यात यावी. राज्यात ओबीसींसाठी मंजूर असलेले ७२ वसतिगृह तत्काळ सुरू करण्यात यावे व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा तात्काळ लागू कराव्यात. धानाला प्रती क्विंटल रु. ४,०००/- हमी भाव द्यावा.


 कुणबी समाजाला अॅट्रसिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे. कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा. या मागण्या घेऊन कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने 5 ऑक्टोंबर 2023 रोज गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे कुणबी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ब्रम्हपुरी तालुक्यातील कुणबी समाज सुध्दा मोठ्या संख्येने मार्चात सहभागी होत आहे.

                      

याची पूर्वतयारी नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी अखिल कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीच्या वतीने बाजार चौक, मराठी शाळेसमोर, प्रेमलाल धोटे कन्सट्रक्शन बिल्डींग ब्रम्हपुरी येथे दिनांक २४ सप्टेंबर २०२३ ला नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले.


या बैठकीला कुणबी समाज मंडळ अध्यक्ष ऋषीजी राऊत,कुणबी समाज मंडळ सचिव ॲड.गोविंद भेंडारकर,दामोधर मिसार,माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, फाल्गुन राऊत,संजय ठाकरे,भाऊराव राऊत, प्रेमलाल धोटे,मोंटू पिलारे,सोनू नाकतोडे,वासुदेव सोंदरकर,अविनाश राऊत, योगेश मीसार, वासुदेव बट्टे, संतोष पिलारे,श्रीकृष्ण अर्जुनकार,प्रदिप सुतार, तेजस गायधने, दिपक नवघडे, जयराम बगमारे, सिद्धेश भर्रे, रामदास राउत, दामोधर ठेंगरी, ज्ञानेश्वर ठेंगरी, आशिष म्हशाखेत्री, लीलाधर झलके, अशोक ठेंगरी, माधव भावे, नारायण मेश्राम, सुखदेव तलमले,  निहाल ढोरे, रवींद्र पीलारे, साधू मिसार व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.


यावेळी 5 ऑक्टोंबरला गडचिरोली येथे होवू घातलेल्या कुणबी महामोर्चाचे नियोजन करण्यात आले. तालुक्यातील विविध गावात अश्याच प्रकारच्या सभा घेऊन हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात आले.  ब्रम्हपुरी तालुक्यातील संपूर्ण समाजाला तसेच संपूर्ण ओबिसी बांधव  व भगिनींना ५ ऑक्टोबर २०२३ ला होऊ घातलेल्या भव्य विरोध मोर्चात सहभागी व्हावे. असे आवाहन कुणबी समाज मंडळ ब्रम्हपुरीच्या 'वतीने करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !