मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने सावली तालुक्यात बालपंचायत मेळावा (चर्चासत्र) संपन्न.
★ शालेय मंत्रीमंडळातील 275 विद्यार्थ्यांचा सहभाग.
एस.के.24 तास
सावली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वयक मा. आकाश गेडाम यांच्या नियंत्रणात सावली तालुक्यातील 27 शाळांमध्ये वर्ग 06 ते 09 पर्यंतच्या 2522 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी (SCALE) "खेळा द्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, गटकार्य, समस्यांचे निराकरण, शिकण्यासाठी शिकणे, स्व-व्यवस्थापन इत्यादी जीवण कौशल्यांचे धडे दिले जातात, तसेच शिक्षणाचे महत्व आणि लिंग समानता याबद्दल देखील सत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्या जात आहे.
सदर उपक्रमा अंतर्गत दिनांक 21 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान सावली तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरी,निफंद्रा,व्यहाड खुर्द, व्यहाड बुज व जीबगाव, या पाच शाळांमध्ये केन्द्र स्थरीय बालपचायत मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये एकूण 22 शाळेतील शालेय मंत्रिमंडळातील 275 विद्यार्थी उपस्थित होते.
मॅजिक बस संस्थेचे तालुका समन्वयक आकाश गेडाम व शाळा सहायक अधिकारी श्रद्धा नागमोते व निशा उमरगुंडावार यांनी विद्यार्थ्यांना बालपंचायतीचे महत्त्व, जबाबदाऱ्या, कर्तव्य व त्याचे अधिकार, त्यासोबतच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भेडसावत असणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण कसे करावे व त्यावर उपाययोजना कशा कराव्यात तसेच बालपंच्यायतीच्या सभेत प्रस्ताव सादर करणे, प्रस्तावावर चर्चा करणे व कठीण समस्या आणि मोठ्या निर्णयासाठी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायतीचे सहकार्य कशा पद्धतीने घ्यावे,इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन केले.
संपूर्ण चर्चासत्र तालुका समन्वयक आकाश गेडाम शाळा सहाय्यक अधिकारी श्रद्धा नागमोते व निशा उमरगुंडावार तसेच समुदाय समन्वयक यांच्या परिश्रमाने यशस्वीरित्या पार पडले.