स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथे महाराष्ट्रातील यशदा मार्गदर्शक चमूंची भेट. ★ यापूर्वी सरपंच प्रशिक्षणार्थीच्या 25 टिमनी या स्मार्ट गावाला भेटी देवून प्रेरणा घेतलेली आहे. ★ चंद्रपूर वन प्रशासन,विकास, व्यवस्थापन व संशोधन प्रबोधीनी, चंद्रपूर यांचे योगदान.

स्मार्ट ग्राम  मंगी (बु) येथे महाराष्ट्रातील यशदा मार्गदर्शक चमूंची भेट.


★ यापूर्वी सरपंच प्रशिक्षणार्थीच्या 25 टिमनी या स्मार्ट गावाला भेटी देवून प्रेरणा घेतलेली आहे.


★ चंद्रपूर वन प्रशासन,विकास, व्यवस्थापन व संशोधन प्रबोधीनी, चंद्रपूर यांचे योगदान.


एस.के.24 तास


राजुरा : राजुरा तालुक्यातील स्मार्ट ग्राम मंगी (बु) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, गावकऱ्यांची नियमित सकाळी 4:30 वाजता श्रमदानातून स्वच्छता, सौंदर्यानी व फुलांनी नटलेला बगीचा, गावाच्या मध्यभागी कोंडवाडयातून रुपांतर केलेले सार्वजनिक वाचनालय. सुंदर शालेय परिसर, शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा, सायन्स पार्कची निर्मीती, गावाच्या प्रवेशव्दारा जवळ ऑक्सिजन पार्क तसेच सर्व धर्मीय संस्कृतीचे संरक्षण, कोवीड-19 लसीकरण 100 टक्के करणारी ग्रामपंचायत इत्यादी. 

सन 2021-2022 या वर्षातील आर.आर.आबा पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त करणारी व सन 2022-2023 या वर्षातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त करणारी स्मार्ट ग्रामपंचायत मंगी (बु) म्हणून ओळख आहे. अशा विविध उपक्रामाची तथा स्मार्ट ग्राम मंगी (बु) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकास कामाची पाहणी करण्यासाठी यशवंतराव विकास प्रशासन प्रबोधनी, पुणे अंतर्गत सामाजिक दृष्टया सुरक्षित गाव या संकल्पनेच्या जिल्हा प्रविण प्रशिक्षकांचे तीन दिवशीय प्रशिक्षणार्थी चमूंनी भेट दिली.


 या टिमचे नेतृत्व खुशाल रामगीरकर,समन्वयक, चंद्रपूर वन प्रशासन, विकास, व्यवस्थापन व संशोधन प्रबोधीनी, चंद्रपूर यांनी केले.या भेटीत नागपूर, गोंदीया,चंद्रपूर,वर्धा,यवतमाळ,  वाशिम, भंडारा, अकोला,अमरावती, बुलढाणा, गडचिरोली या जिल्हयातील मार्गदर्शकांनी भेट देवून समाधान व्यक्त केले. यापुर्वी सरपंच प्रशिक्षणार्थीच्या 25 टिमची या गावाला भेटी देवून अभ्यास करण्यात आला. येणाऱ्या प्रत्येक टिमकडून गावाचे कौतुक होत आहे. ग्रामपंचायत, मंगी (बु) हे गाव शाश्वत विकासाकडे वाटचाल करीत आहे.  

       

या प्रसंगी ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगताना सन 2012 पासून ग्रामस्थ व युवकांनी सातत्याने दररोज पहाटे 4:30 वाजता पासून 2 तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले. ग्रामभेटीतून स्वच्छता पाहून मानयवार चमू भाराहून गेले. यानंतर संपूर्ण गावाची पाहणी करण्यात आली.


 तसेच ऑक्सिजन पार्क,शेततळे व सामुहिक विहीरीची पाहणी करण्यात आली. पाहणी करताना दृष्य स्वरुपात गावातील नालीमुक्त पण शोषखडडेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सौंदर्यात्मक प्रवेशव्दार, गावाची सातत्याने होणारी स्वच्छता,  गावाच्या बाहेरील रोडची श्रमदानातून होणारी स्वच्छता, 12000 वृक्षांचे वृक्षारोपन व संवर्धन, स्वच्छ शालेय परिसराची पाहणी केली. मंगी (बु) हे गाव शाश्वत विकासाचे नाविण्यपूर्ण मॉडेल असल्याचे यशदा चमूनी मनोगतातून व्यक्त केले. 

       

यशदा चमुनी गावाच्या भेटीनंतर सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात गावातील सरपंच शंकर तोडासे, उपसरपंच वासुदेव चापले, ग्राम विकास समितीचे अध्यक्ष परशुराम तोडासाम, माजी जि.प.सदस्य भिमरावजी पुसाम,ग्रामपंचायतचे सचिव गजानन वंजारे, माजी मुख्याध्यापक रत्नाकर भेंडे, ग्रा.पं.सदस्य रामभाउ तलांडे,तंमुस माजी अध्यक्ष प्रकाश वेडमे, गणपतजी चापले, गणपत कोडापे, माधव कुमरे, रामशाव कन्नाके, आनंदराव मडपती, विनोद बुटले, रमेश कोडापे, विनोद आत्राम, सुरेश आळे, बापुराव चिलकुलवार यांनी भेटी दरम्यान वेळोवेळी गावाच्या विकास कामाची माहिती देत होते. यासाठी गावातील नितीन मरस्कोल्हे, चरणदास चिलकुलवार, रोजगारसेवक दिनेश राठोड,  आपरेटर बालाजी मुंडे तथा अनुसयाबाई कुळसंगे व फुलाबाई सिडाम यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !