मॅजिक बस संस्थेच्या वतीने, चामोर्शी तालुक्यातील 11 गावात पोषण आहार सप्ताह संपन्न.
★ संपूर्ण तालुक्यातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग.
एस.के.24 तास
चामोर्शी : दिनांक : 1 ते 7 सप्टेंबर 2023 हा कालावधी पोषण आहार सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या सप्ताहाचे औचित्य साधून 1 ते 7 सप्टेंबर 2023 या कालावधीत मॅजिक बस संस्थेच्या वत्तीने गडचिरोली जिल्ह्यात, चामोर्शी तालुक्यातील मौजा भेंडाळा,कान्होली,वेलतुर, सोनापूर, जुनीवाकडी, गणपूर, मुधोली, कुणघाडा, तळोधी,सगनापूर व घारगाव इत्यादी गावांमध्ये पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला.
सप्ताहाच्या निमित्ताने गावातील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी पाककला स्पर्धा, दैनंदिन पोषक आहार तक्ता स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या व स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना व सहभागी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या.त्या सोबतच गावात प्रभातफेरी काढण्यात आली आणि पोषण आहारा संदर्भात तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात आले. इत्यादी कार्यक्रम घेऊन पोषन आहार सप्ताह साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे व तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून गावातील वैद्यकीय अधिकारी, ANM, GNM, यांची उपस्थिती होती. तसेच शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार,रोशन तिवाडे,दिपक ढपकस,अश्विनी उराडे,पंकज शंभरकर,अस्मिता उराडे व गावातील समुदाय समन्वयक यांनी अथक परिश्रम घेतले.