1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास. ★ गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय.

 


1 ऑक्टोबरपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकास मिळणार पास.


★  गर्दी टाळण्याकरीता रुग्णालय प्रशासनाचा निर्णय.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय),चंद्रपूर येथे रुग्ण दाखल होतांना रुग्णासोबत बरेच नातेवाईक रुग्णालयात गर्दी करतात. त्यामुळे वारंवार सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यादृष्टीने दि. 1 ऑक्टोबर 2023 पासून रुग्णालयात रुग्णास दाखल करतांना संबंधित रुग्ण व रुग्णाच्या एका नातेवाईकास पास वितरित करण्यात येणार आहे.


या पासच्या आधारे रुग्णांच्या नातेवाईकास रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जाईल.तसेच रुग्णास भेटण्याची व रुग्णासोबत थांबण्याची परवानगी देखील देण्यात येणार आहे.विनाकारण रुग्णालयामध्ये गर्दी होऊ नये,याकरीता नागरीकांनी रुग्णालय प्रशासन,डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !