चिमूर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन.
★ खासदार अशोक नेते व आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांच्या शुभहस्ते संयुक्त विद्यमाने कुदळ मारून कामाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ केला.
एस.के.24 तास
चिमुर : दि.१६ ऑगस्ट २०२३ घरगुती नळ जोळणी प्रकल्प केंद्र शासनाची पुरस्कृत योजना जलजीवन मिशन हर घर नल,हर घर जल या योजनेच्या भूमिपूजनाचा शुभारंभ करतांना खासदार अशोक नेते यांनी बोलतांना पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी अनेक गावांतील, शहरातील ग्रामीण भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.परंतु विहीरी, बोरवेलद्वारे शुद्ध पाणी मिळत नव्हता,अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ अनेक बिमारीचा सामना करावा लागत होता.यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी हर घर नल योजना आणली. या योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेचा उद्देश असुन या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे. हा योजनेचा उद्देश आहे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत आज चिमुर क्रांतीदिनी क्रांतीभूमीत घरगुती नळ योजनेचा शुभारंभ होतोय ही आनंदायी बाब आहे.चिमुर नगरीच्या विकास कामासाठी सातत्याने माझा सुद्धा प्रयत्न राहील असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी याप्रसंगी केले.
आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्ती कुमार यांनी बोलतांना माझ्या प्रयत्नाने नगरातील विकास कामे झाली. त्यांच भूमिपूजन होत आहे. या नगरातील वार्डामध्ये अनेक प्रश्न,समस्या होते. नागरिकांचे जनतेचे समस्या,प्रश्न, अडीअडचणी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे.जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून मी हे काम करीत असतो त्यामुळे मला जनतेच्या रुपाने ऊर्जा व आशीर्वाद मिळतो.असे यावेळी आमदार बंटीभाऊ यांनी वक्तव्य केलं.
या प्रसंगी चिमुर नगरातील ओपण स्पेस सौंदर्यीकरण दुर्गा माता मंदिर व आदर्श कॉलनी, वडाळा येथील अंदाजे किंमत २४६.४३ लक्ष रुपये,व प्रभाग क्र.५ यात्रा मैदान बगीचा तयार करणे अंदाजे किंमत ४४२.१६ लक्ष रुपये अशा विविध सौंदर्यीकरण कामांचे (फीत )रिबीन कापून फलकांवर कामाच्या भूमिपूजनाचे उदघाटन समारंभ सोहळा कुदळ मारून खासदार अशोक नेते व आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडीया यांच्या संयुक्त शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्ती कुमार भांगडिया,प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.श्यामजी हटवादे,तालुकाध्यक्ष राजूभाऊ झाडे,ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, ज्येष्ठ नेते दिगांबर खालोरे,ओबीसीचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ थुटे,नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, युवा नेते बाळूभाऊ पिसे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंटी भाऊ वनकर, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते,नगरातील नागरिक,उपस्थित होते.