बस सेवा सुरळीत ठेवा अन्यथा आंदोलन करू ग्रा.पं.युवा सदस्य रोशन कोहळे यांचा बस आगारा गडचिरोली ला इशारा.


बस सेवा सुरळीत ठेवा अन्यथा आंदोलन करू ग्रा.पं.युवा सदस्य रोशन कोहळे यांचा बस आगारा गडचिरोली ला इशारा.


एस.के.24 तास


चामोर्शी : समोरची तालुक्यातील मौजा मारोडा जामगिरी मार्गे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ६० ते ६५ संख्या असून हे विद्यार्थी दहा ते पाच या पाळीमध्ये चामोर्शी येथे विविध क्षेत्रात शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांची ने आन करण्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली आहे परंतु हे बस योग्य वेळेत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.


विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची शाळा 10 ते 5 या वेळेत असते परंतु बस ही सकाळी 11.30 वाजता व रात्री 8 वाजता येते यामुळे विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत वाट बघावी लागत आहे .यामध्ये वयोगट 11 ते 21 च्या युवक युवती असून घरच्यांना शिक्षणासाठी गेलेल्या पाल्यांची घरी वेळेवर येत नसल्यामुळे सतत काळजी करावी लागत आहे.


समोर बोलताना रोशन कोहळे म्हणाले रात्री उशिरापर्यंत बस येत असल्यामुळे काही लहान मूल त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. म्हणून त्यांना बस येईल वेळेवर पोहोचता करावी ही विनंती केली आहे.


या मार्गे भोगणबोडी हेटी, बोगनबोडी 36, मारोडा, नवग्राम व जामगिरी या गावातील मुलं चामोर्शी येथे शिक्षणाकरिता  येत आहेत.विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सकाळी 10 वाजता व सायंकाळी 5.30 वाजता बसची सुविधा करण्यात ही निवेदनात  विनंती करण्यात आली आहे.


त्यामुळे आता गाडी वेळेवर न आल्यास ग्रामपंचायत सदस्य रोशन कोहळे,ग्रामपंचायत सरपंच जामगिरी भैय्याजी वाढई व जय शिवराय मंडळ मारोडा, विद्यार्थी व पालकांनी आंदोलन करू असे आश्वासन निवेदन देताना आगार प्रमुख बस डेपो गडचिरोली यांना दिला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !