बालाजी वॉर्ड परिसरातील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावा अन्यथा आंदोलन - पंकज माकोडे.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२५/०८/२३ ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या हद्दीतील बालाजी वॉर्ड येथील टॉकीज रोड लगत दुकानाचे गाळे चे बांधकाम करतांना तळघराचे काम अर्धवट केल्याने त्या ठिकाणी पावसाळ्याचे पाणी साचून राहते.त्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यातून निर्माण होणारी दुर्गंधी, डासाचा प्रादुर्भाव होऊन नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे तसेच सदर तळघराला डबक्या चे स्वरूप प्राप्त झाले असून सुरक्षितेच्या दृष्टीने कोणतिही उपाय योजना केली नाही.
त्यामुळे एखाद्यावेळेस लहान मुलांवर अनुचित प्रकार घडू शकतो.वारंवार नगरपरिषदेला या बाबत पत्रव्यवहार करूनही दोन वर्षापासून कोणतीच कारवाई नगरपरिषद प्रशासनाने केली नाही.एखाद्याचे जीवित हानी होण्याची व परिसरातील आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची वाट नगरपरिषद प्रशासन पाहत आहे काय? असे प्रश्न निर्माण होऊन येत्या काही दिवसात त्या बांधकामातील तळघराच्या साचलेल्या पाण्याची विल्लेवाट ताबळतोब करावी अशी मागणी पंकज माकोडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे महामंत्री यांनी एका निवेदनातून केली आहे.
आमच्या मागणीचा विचार करून उपाय योजना न केल्यास परिसरातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.सविस्तर वृत्त की, ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या बालाजी वॉर्ड टॉकीज मेन रोड लगत मागील तीन वर्षापासून हनिफिया गरीब नवाज मज्जीत यांच्या कमिटीने दुकानाचे गाळे काढले.
ते काढत असताना तळघर बनविण्यात आले.परंतु काम पूर्णत्वास न आल्याने दोन, अडिज वर्षापासून त्या तळघरात ला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून पावसाळ्यात तिथे पाणी साचून राहते. सदर बांधकामातील मागील भिंत अर्धवट असल्यामुळे लहान मुले खेळता खेळता तळघरात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच त्या साचलेल्या पाण्यामुळे होणारी दुर्गंधी,डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात डेंग्यू,मलेरिया फायलेरिया आदी आजार उदभवून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. सदर समस्येबाबत मागील दोन वर्षापासून पत्रव्यवहार निवेदने देऊन सुद्धा नगर परिषद प्रशासनाने आजतागायत कोणतीच कारवाई केली नाही.
तळघरात साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी या मागणीचे निवेदन नुकतेच मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रम्हपुरी यांना देण्यात आले उपाय योजना न केल्यास परिसरातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊन यासाठी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देताना मनोज वठे नगरसेवक,पंकज माकोडे,साकेत भानारकर,तनय देशकर जिल्हा भाजपा युवा मोर्चा सचिव,मनीष पटेल,अंशुल पोटे आदी उपस्थित होते.