प्रा.हरी नरकेसारखा विचावंत जाणे ही बौध्दिक चळवळीची हाणी. -डॉ राजेंद्र डांगे : भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे.सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१०/०८/२३ " महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि इथले पुरोगामित्व टिकले आहे ते परिवर्तनवादी विचारांमुळे.छत्रपती शाहू, म.फुले, डॉ आंबेडकरांचा वारसा चालविणारे प्रखर सत्यवादी आणि परिवर्तनवादी विचारवंत काळाच्या पडद्याआड जाणे ही बौध्दिक चळवळीची हाणी आहे "असे बहूमोल विचार कला शाखाप्रमुख डॉ राजेंद्र डांगेंनी मांडले.ते प्रा हरी नरके भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते.मराठी वाड् मय मंडळ आयोजित श्रद्धांजली कार्यक्रम प्राचार्य डॉ डी एच गहाणेंच्या मार्गदर्शनाखाली ने.हि.महाविद्यालयात घेण्यात आला.
विचारपिठावर मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर, इंग्रजी विभागाचे डॉ युवराज मेश्राम, डॉ प्रकाश वट्टी उपस्थित होते.यावेळी डॉ खानोरकरांनी,प्रा नरके सर म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश होता.ते कोणतीही माहिती सांगताना पुराव्यांचा डोंगर उभा करत.फुले,शाहू,आंबेकरांच्या विचारांचे ते वाहक होते.बहुजन समाजाच्या हितासाठी ते अखेरपर्यंत झिजले,असे विचार मांडले तर डॉ मेश्रामांनी,प्रा नरके सरांशी माझे जिव्हाळयाचे संबंध राहिले असून मी अडलो तर त्याचा उलगडा सर करत.सरांची प्रखर वाणी व दांडगा व्यासंग कायम आमच्या स्मरणात राहणार आहे,असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ प्रकाश वट्टींनी केले.यानंतर सामूहिक श्रध्दांजली कार्यक्रम दोन मिनिटे मौन पाळून घेण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ.पद्माकर वानखडे,डॉ रतन मेश्राम,प्रा. माधव चुटे,प्रा.अस्मिता कोठेवार व विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.