प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ब्रह्मपुरीकरांना मागितले भाजपासाठी समर्थन.
★ ब्रह्मपुरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांसोबत साधला संवाद ; लोकसभा,विधानसभा निवडणूकीच्या कामाला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना.
★ शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची ही घेतली भेट.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी : दिनांक,२४/०८/२३ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे "संपर्क से समर्थन" या अभियानांतर्गत ब्रह्मपुरी येथे बाजार पेठेत पदयात्रा काढून नागरिकांसोबत व व्यापारांसोबत संवाद साधला संवाद साधला. ब्रह्मपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोडिया सभागृहापर्यंत प्रदेशाध्यक्षांनी बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांसोबत संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त सरकारच्या योजनांची व कामांची माहिती नागरिकांना माहिती देत भाजपाला समर्थन देण्याची मागणी केली. प्रसंगी त्यांच्यासोबत खासदार अशोक नेते,भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर येथील लोढीया सभागृहात 2024 विजय संकल्पाची संघटनात्मक बैठक पार पडली. या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, चिमूर व देवरी या तीन विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत कामाचा आढावा घेतला. विधानसभेतील ६० हजार घरी जाऊन समर्थन मागण्याचे आव्हान यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.
यासोबतच आगामी 13 महिन्यांपर्यंत पक्षासाठी झोकून काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणावर विश्वास ठेवून अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रवेश केला. याप्रसंगी मंचावर खासदार अशोक नेते, भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आमदार अतुल देशकर, माजी आमदार केशव मानकर, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार भैरसिंग नागपुरे, जिल्हाध्यक्ष गडचिरोली प्रशांत वाघरे लोकसभा संयोजक किसन नागदेवे, प्रमोद पिपरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे संचालन भाजपा महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे यांनी केले.
संघटनात्मक बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ब्रह्मपुरीतील प्रसिद्ध डॉक्टर व कुणबी समाजाचे नेते डॉ. सतीश दोनाकडर यांची भेट घेत मोदी सरकारच्या 9 वर्षाच्या विकास कामांची पुस्तिका भेट दिली. यानंतर कुर्झा वार्डातील प्रगतशील शेतकरी तथा तेली समाजाचे नेते विजय फटींग यांच्या निवासस्थानी भेट घेत मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती दिली व समर्थन मागितले. यानंतर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य व बहुजन समाजाचे नेते डॉ. देवेश कांबळे यांची निवासस्थानी भेट घेत मोदी सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती देत संवाद साधला. याप्रसंगी खासदार अशोक नेते भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर माजी आमदार अतुल देशकर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम उपस्थित होते.
या दौऱ्याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, तालुका अध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, अविनाश पाल, राजेंद्र बोरकर, शहर अध्यक्ष अरविंद नंदूरकर, आशिष कार्लेकर यांच्या सह ब्रह्मपुरी चिमूर देवरी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.