खेमजईमध्ये सावित्रीबाई फुले अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन संपन्न.
एस.के.24 तास
चिमुर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या वाचनातून ज्ञानामृत मिळावे आणि हेच खेड्यातील मुलं जगाच्या स्पर्धेत उतरावे या उद्देशाने खेमजई येथील ग्रामविकास समितीच्या पुढाकारातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका केंद्राचा उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद शाळा परिसरात थाटात पार पडला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.गंपावर, सरपंच मनीषा चौधरी,तसेच विकास ग्रुपचे सदस्य एड.अरविंद पेटकर, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक नथुजी घरत, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी धोत्रे, पोलीस पाटील विश्वनाथ तुरानकर, सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ कांबळे,प्रमोद गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड यांनी अभ्यासिकेला भेट देऊन आलमारीच्या मदतीची ग्वाही दिली. तसेच शेगाव पोलीस स्टेशनचेठाणेदारमेश्राम यांनी अभ्यासिकेला भेट देऊन चार हजार रुपये किमतीच्या पुस्तकांची मदत केली तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासा संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
अभ्यासिकेला सर्व स्तरावरून पुस्तक, साहित्य व आर्थिक स्वरूपात भरभरून सहकार्य मिळत असून विकास ग्रुप सदस्य डॉ.संदीप भेले,किशोर पेटकर ,अरविंद पेटकर, पंकज निब्रड, डॉ. प्रमोद गंपावार , रवी कांबळे, प्रशांत पोईनकर, अनिल साळवे, नथुजी घरत, राजू चौधरी, विठ्ठल शेरकुरे,अमोल धोत्रे यांनी मदत केली.
गावातील युवांनी अभ्यासिका सातत्याने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहून स्वतःच्या नावासोबतच गावाचे नाव लौकिक करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनी केले केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कामटकर, प्रास्ताविक विलास चौधरी, आभार प्रदर्शन लंकेश भेले यांनी केले.
या परिवर्तनशील कार्याला " विकास ग्रुप " यांचे भक्कम पाठबळ मिळत असून जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत खेमजई यांचे फार मोठे सहकार्य लाभत आहे.अभ्यासिका सुरू करण्यासाठी व उद्घाटनिय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील ग्राम विकास समितीचे अनेक युवकांनी परिश्रम घेतले.