मा.खासदार अशोकजी नेते यांची बोदली येथील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते यादव निकोडे यांची घेतली भेट.
एस.के.24 तास
गडचिरोली:- जिल्ह्यातील बोदली येथील जुने जाणते भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते यादवराव निकोडे यांची बरेच दिवसापासून तब्येत बरी नव्हती अशी बातमी खासदार अशोक जी नेते यांना कळताच त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे अंदाजे वय ९८ वर्षे असून खासदार महोदयानी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत जुने आठवणी काढत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत चर्चा केली.
याप्रसंगी बोदलीचे सरपंच आकाश निकोडे,नितीन कुनघाडकर, आशिष पंदिलवार,सुरेश राठोड, दतू सुत्रपवार,अभिजीत कोरडे, उपस्थित होते.