महानोरांसारखा पर्यावरण प्रबोधनवादी कवी होणे नाही. - कवी डॉ.धनराज खानोरकर : श्रध्दांजली कार्यक्रम.
(अमरदीप लोखंडे - सहसंपादक)
ब्रह्मपुरी : दिनांक,०३/०८/२३ ) " जांभूळ पिकल्या झाडाखाली,मी रात टाकली सारख्या रानकविता लिहणारे, विपुल निसर्गसंपन्नता ज्यांच्या कवितेचा गाभा आहे. असे आयुष्यभर पर्यावरणपूरक कार्य करणारे लोकलयीचे लोककाव्य प्रबोधनवादी कवी होणे नाही,अशा शब्दांत कवी डॉ धनराज खानोरकरांनी कवी ना.धो.महानोरांना श्रध्दांजली अर्पण केली.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात कवी ना.धो.महानोर श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते.
या प्रसंगी डॉ.पद्माकर वानखडेंनी कवी महानोरांनी बोलीभाषेत कविता लिहून लोकलयीत सादरीकरण केले.अनेक चित्रपटांसाठी त्यांची कविता गीतं होऊन लोकप्रिय झालीत.ते उत्युच दर्जाचे लोककवी होते,असे मनोगत मांडले.याप्रसंगी अनेक विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम प्राचार्य डॉ,डी.एच गहाणें च्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
संचालन व आभार डॉ,आशिष साखरकरांनी केले.यानंतर महानोरांची गाणी विद्यार्थ्यांनी सचित्र दाखविण्यात आली.शेवटी दोन मिनिटे मौन पाळून कवी महानोरांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.