गोसीखुर्द आसोला तलावांचे पाणी शेतीसाठी सोडा. - राकेश गोलेपल्लीवार ग्रा.पं.सदस्य यांची मागणी.

गोसीखुर्द आसोला तलावांचे पाणी शेतीसाठी सोडा. - राकेश गोलेपल्लीवार ग्रा.पं.सदस्य यांची मागणी.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील जिबगांव,पेटगाव, सिर्सी,साखरी, लोढोली,जांब,केरोडा,रैतवारी व चक पेडगांव आदी गावातील शेतकरी पाणी येत नसल्यामुळे रोवणी थांबली असून शेतीसाठी लवकरात लवकर आसोला तलाव गोसीखुर्दचे  पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जिबगांव येथील राकेश गोलेपल्लीवार ग्रा.प.सदस्य यांची मागणी केली आहे.


सावली तालुक्यात जुलै महिन्यात  दमदार पावसाने सुरुवात केली होती.त्यामुळे शेतकऱ्यानी शेतीच्या कामास सुरुवात केली. सद्या तालुक्यात रोवणीच्या कामाला वेग आला असतांनाच ऑगस्ट महिना लागताच पावसाने जणू दडीच मारून दील्याने शेतकऱ्याची शेतीची कामे खोळंबली आहेत.गोसेखुर्दचे पाणी मागील वर्षी टेस्टिंग करून बंद करण्यात आले. पण अजूनही शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेले नाही.काही ठिकाणी नहर फुटले आहेत तर काही रोवणे होवुन सुध्दा पाणी नसल्याने करपण्याचे मार्गावर असल्याने लवकरात लवकर पाणी सोडुन शेतकरी बळीराजाला धिर द्यावे अशी मागणी ग्रा.पं.सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.


शेतकरी अडचणीत असतांना पाणी सोडत नसल्याने आपल्या परिसरात फक्त शोकेज साठी पाईप लाईन टाकण्यात आले का ? अशी लोकांमध्ये चर्चा चालू असुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी सोडुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राकेश गोलेपल्लिवार यांनी केले आहे

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !