कुर्झा वार्डातील अष्टविनायक भंजन मंडळाचे प्रबोधन कार्य : संत, राष्ट्रसंताच्या भजनातून जनजागृती.
अमरदीप लोखंडे. सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२५/०८/२३ येथील अष्टविनायक भजन मंडळ कितीतरी दिवसांपासून सततचे संगीत जागृती भजन करुन प्रबोधन कार्य पार पाडीत आहे.
या भजन मंडळात पेटीवादक वाल्मीक बावनकुळे,तबलावादक किशोर उराडे आणि त्यांना साथ देणारे प्रबोधन भजन गाणारे संतोष बावनकुळे,अशोक उराडे,मधुकर खेत्रे,तुलाराम बावनकुळे,मनोज खेळकर,योगेश दिवटे, डॉ धनराज खानोरकर,भास्कर खानोरकर,राकेश वैद्य, पुंडलिक कामथे,चैतन्य बावनकुळे इत्यादी भजन मंडळी यात समाविष्ट असून श्रावण महिनाभर येथील गांधी चौकातील विठ्ठल मंदिरात हे जागृती भजन रोज पार पडत आहे.
नागपंचमी ते पोळ या श्रावणात रोज जागृती भजन करुन इतरांकडे प्रसंगानुसार हा भजन मंडळ आपले जागृती भजन करतो आहे.यात माझे माहेर पंढरी,हरि भजनाविन दिन काळ घालवू नको रे !, विठ्ठल आवडी,चल चल अपुल्या गावाला,उठा तरुणानो!,तू माहूर गडवासिनी रेणूका,ऐसा है नाम तेरा,तू सुंदर दिखता है तो क्या ? असे कितीतरी भजन व अभंग या भजनक-यांना मुखोद् गत आहेत.
अनेक भजन स्पर्धांमध्येसुध्दा आपला सक्रिय सहभाग नोंदवून या भजन मंडळाने योग्य बक्षिस पटकाविले आहेत.काही महिला मंडळीसुध्दा या भजन कार्यात आपला सहभाग नोंदवून त्याही भजनांद्वारे जागृती करण्याचे महत्वाचे काम करतांना दिसतात.यांच्यातील अनेक भजनकरी हे कष्टकरी वर्गातील असून 'दिवसभर आपले का व रात्रो हरीनाम' असा दिनक्रम त्यांचा चालू आहे.