२४ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धाचे आयोजन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : नक्षत्राचं देणं काव्यमंच,मुख्यालय भोसरी,पुणे च्या वतीने संपुर्ण महाराष्टातील कवी कवयित्रींना आवाहन करण्यात येते की,दरवर्षीप्रमाणे प्रचंड प्रतिसाद मिळत असलेल्या या मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विनामुल्य ही २४ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.आपल्या कविता श्रावण व निसर्ग या विषयावरील दोन रचना पाठवाव्या.विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह,सन्मानपञ,शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते.यात सहभागी होणा-या प्रत्येक कवी कवयित्रींना सन्मानपञ, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल ही संपन्न होणार आहे.
कविता पाठविण्याचा पत्ता-प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे,राष्टीय अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच,साई सदन,ए/३,महालक्ष्मी हाईटस,भोसरी,पुणे - ४११०३९ या पत्यावर पोष्टाने पाठवाव्यात.कविता पाठविण्याची अंतिम तारीख ३० आगस्ट २०२३ आहे.तरी जास्तीत जास्त कवींनी यात सहभाग नोंदविण्याचे आवाहान संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.